संग्रहित छायाचित्र
पिंपरी-चिंचवड येथील नाशिक फाट्याजवळ खासगी ट्रॅव्हल्सला अचानकपणे भीषण आग लागली. सुदैवाने ट्रॅव्हल्समध्ये प्रवासी नसल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. सकाळी सातच्या सुमारास बसला आग लागली. शॉर्टसर्किट होऊन ट्रॅव्हल्सला आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे. (Bus Caught Fire Pimpri-Chinchwad)
वल्लभनगर येथील अग्निशमन दलाने येऊन आगीवर नियंत्रण मिळवले. मिळालेल्या माहितीनुसार, निगडी येथून भोसरीच्या दिशेने जाणाऱ्या बसला भीषण आग लागली. सुदैवाने यात प्रवासी नसल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. ट्रॅव्हल्समध्ये दोन चालक होते. त्यापैकी एक जण ट्रॅव्हलमध्ये झोपला होता. बसला आग लागल्यानंतर समोरील ट्रॅव्हल्स चालकाने प्रसंगावधान दाखवत त्याला बाहेर काढले. याबाबतची माहिती वल्लभनगर येथील अग्निशमन विभागाला देण्यात आली. अग्निशमनच्या दोन वाहनांनी तातडीने येऊन आगीवर नियंत्रण मिळवले. तोपर्यंत ट्रॅव्हलच्या पुढील भाग जळून खाक झाला होता. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे. भूषण येवले (फायरमन),विशाल फडतरे (डी.सी.ओ),रुपेश जाधव (डी.सी.ओ),मयूर कुंभार (डी.सी.ओ), सिध्देश दरवेस(ट्रे.फायरमन),प्रतिक अहिरेकर,समीर पोटे, प्रतिक खांडगे,शुभम क्षीरसागर,अनिकेत गोडसे,संकेत भोसले,अक्षय झुरे या अग्निशमन जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.