पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील ९ पोलीस निरीक्षक, तीन सहायक निरीक्षक आणि ९ उपनिरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या (Transfers under Sub-Inspector) करण्यात आल्या. याबाबतचे आदेश बुधवारी (१३ मार्च) देण्यात आले आहेत. (Pimpri Chinchwad Police)
राज्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या नुकत्याच मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्या. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरात देखील काही अधिकारी आले आहेत. या अधिकाऱ्यांना नियंत्रण कक्षात ठेवण्यात आले होते. आता त्यांची पोलीस ठाणे, गुन्हे शाखांमध्ये बदली करण्यात आली आहे. (Pimpri Chinchwad Police transfers)
बदली झालेले पोलीस निरीक्षक (कोठून - कोठे)
- नितीन फटांगरे (देहूरोड पोलीस ठाणे - भोसरी पोलीस ठाणे)
- भीमा नरके (चाकण पोलीस ठाणे - आळंदी पोलीस ठाणे)
- महेश बनसोडे (नियंत्रण कक्ष - सांगवी पोलीस ठाणे)
- गणेश जामदार (नियंत्रण कक्ष - भोसरी एमआयडीसी पोलीस ठाणे)
- प्रवीण कांबळे (नियंत्रण कक्ष - विशेष शाखा)
- विजयकुमार वाकसे (नियंत्रण कक्ष - गुन्हे शाखा)
- संदीप पाटील (नियंत्रण कक्ष - चाकण पोलीस ठाणे)
- धनंजय कापरे (नियंत्रण कक्ष - पिंपरी पोलीस ठाणे)
- भारत शिंदे (नियंत्रण कक्ष - भोसरी पोलीस ठाणे)
बदली झालेले सहायक निरीक्षक
- छाया गुजर (नियंत्रण कक्ष - भोसरी पोलीस ठाणे)
- प्रवीण स्वामी (नियंत्रण कक्ष - गुन्हे शाखा)
- राकेश भामरे (नियंत्रण कक्ष - दिघी पोलीस ठाणे)
बदली झालेले पोलीस उपनिरीक्षक
- मीरा त्र्यंबके (नियंत्रण कक्ष - विशेष शाखा)
- अश्विनी तळे (नियंत्रण कक्ष - चिखली पोलीस ठाणे)
- चक्रधर ताकभाते (नियंत्रण कक्ष - सांगीव पोलीस ठाणे)
- समाधान मचाले (नियंत्रण कक्ष - निगडी पोलीस ठाणे)
- अजयकुमार राठोड (नियंत्रण कक्ष - देहूरोड पोलीस ठाणे)
- अश्विनी उबाळे (नियंत्रण कक्ष - पिंपरी पोलीस ठाणे)
- प्रकाश कातकाडे (नियंत्रण कक्ष - चाकण पोलीस ठाणे)
- नाईद शेख (नियंत्रण कक्ष - शिरगाव-परंदवडी पोलीस ठाणे)
- वैशाली गुळवे (नियंत्रण कक्ष - दिघी पोलीस ठाणे)