पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबेंना राष्ट्रपती पोलीस पुरस्कार जाहीर
पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदकाने गौरविण्यात येणार आहे. २०२३ च्या स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्रातील उत्कृष्ट सेवेबद्दल पुरस्कार जाहीर झालेल्या विजेत्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असून त्यात विनय कुमार चौबे यांचे नाव आहे.
विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक (पीपीएम) देण्यासाठी निवड करताना पोलीस सेवेतील विशेष कार्यामध्ये असलेल्या सहभागाच्या नोंदीवरून दिले जाते आणि गुणवत्तेसाठी असलेले पोलीस पदक (पीएम) संसाधन आणि कर्तव्य, सेवेतील निष्ठा यांचा विचार करून अमूल्य सेवेसाठी प्रदान केले जाते.
विनय कुमार चौबे यांच्यासह महाराष्ट्रातील दोन अन्य अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये अतिरिक्त महासंचालक (विशेष कार्य) प्रवीण सयाजीराव साळुंखे आणि अमरावतीचे विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत जगन्नाथ नाईकनवरे यांना देखील पुरस्कार जाहीर झाला आहे.
दरम्यान, २०२३ च्या स्वातंत्र्य दिनानिमित्त एकूण ९५४ पोलीस कर्मचार्यांना पोलीस पदके प्रदान करण्यात आली आहेत. शौर्यसाठी राष्ट्रपती पोलीस पदक यासह २२९ जणांना पोलीस शौर्य पदक, विशेष सेवेसाठी ८२ जणांना राष्ट्रपती पोलीस पदक (PPM) आणि गुणवंत सेवेसाठी ६४२ जणांना पोलीस पदक (PM) प्रदान करण्यात आले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.