पिंपरी-चिंचवड : कासारवाडी रेल्वे क्रॉसिंग बोलार्ड बसवण्यास विरोध
कासारवाडी रेल्वे क्रॉसिंग येथे मोटार सायकल (दुचाकी) पास होईल असे बोलार्ड बसवल्यास कासारवाडीतील नागरिकांची प्रचंड मोठी गैरसोय होणार आहे. परिसरातील नागरिकांसाठी ते अन्यायकारक असल्याने त्याला विरोध असल्याचे लेखी पत्र स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे आणि माजी नगरसेवक शाम लांडे यांनी भोसरी विभागाचे पोलीस वाहतूक निरीक्षक बी. आर. साळुंखे यांना आज दिले.
पत्रात आपला विरोध का आहे त्यामागचे सविस्तर कारण दिले आहे. त्यात म्हटले आहे की, कासारवाडी रेल्वे क्रॉसिंग व मुंबई-पुणे हायवे अंडरपास येथे वाहतूक कोंडी होत असल्याने, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका बी.आर.टी.एस. विभाग व भोसरी वाहतूक विभाग यांनी सदर रस्त्याची पाहणी केली. या ठिकाणी असलेली वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी कासारवाडी रेल्वे क्रॉसिंग येथे मोटार सायकल (दुचाकी) पास होईल, असे बोलार्ड बसवण्यात येणार आहे. अशा प्रकारचा पत्रव्यवहार भोसरी वाहतूक विभाग यांच्या मार्फत झाला असल्याचे समजले. कासारवाडी रेल्वे क्रॉसिंग येथे मोटार सायकल (दुचाकी) पास होईल असे बोलार्ड बसवण्यास आमचा विरोध असल्याचे सीमा सावळे आणि शाम लांडे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे कासारवाडी रेल्वे क्रॉसिंग येथे मोटार सायकल (दुचाकी) पास होईल असे बोलार्ड बसवल्यास, सर्व धार्मिक कार्यक्रमांना बाधा निर्माण होणार आहे तसेच कासारवाडीतील नागरिकांना गैरसोईचे व अन्यायकारक आहे. त्यामुळे सदर बोलार्ड बसवण्यास आमचा आणि समस्त कासारवाडी ग्रामस्थांचा विरोध आहे. कासारवाडी रेल्वे क्रॉसिंग येथे मोटार सायकल (दुचाकी) पास होईल असे बोलार्ड बसून सदरील भागात होत असलेल्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार नाही.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.