संग्रहित छायाचित्र
राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी उद्या शनिवारी (दि. २३) होत आहे. यामध्ये चिंचवड, भोसरी, पिंपरी आणि मावळ विधानसभा मतदारसंघातील विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने निकाल ऐकण्यासाठी मतमोजणीच्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्यांना थांबण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
यावेळी कार्यकर्त्यांमध्ये वादाचे प्रसंग घडू नयेत यासाठी पोलीसांनी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांना थांबाण्यासाठी तसेच त्यांच्या वाहनांच्या पार्कींगसाठी ठिकाणे निश्चित केली आहेत.
चिंचवड मतदारसंघातील महाविकास आघाडी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना थेरगाव गावठाण येथे थांबण्यासाठी व पार्किंग म्हणून जागा राखीव राहील.
महायुती उमेदवारांंच्या कार्यकर्त्यांना तापकीर चौक ते तापकीर मळा या दरम्यान रस्त्याच्या कडेची मोकळ्या जागा थांबण्यासाठी व पार्किंग म्हणून राखीव राहील. पिंपरी-चिंचवड महापालिका कामगार भवन थेरगाव समोरील पीएमपीएल बससाठी असलेले डी-मार्टच्या बाजूचे पार्किंग हे इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांना थांबण्यासाठी व पार्किंग म्हणून राखीव राहील.
मावळ मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बापुसाहेब भेगडे व त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी तळेगाव स्टेशन चौकातून हरणेश्वर सोसायटी मार्गे येवून वाघळे पार्क, हरणेश्वर सोसायटी, येथील अंतर्गत रोड लगत तसेच भारत पेट्रोल पंप ते ईगल कार्नर पर्यंत सेवा रस्त्यावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
कार्यकर्त्यांना थांबण्याकरीता नुतन पॉलेटेक्निल कॉलेजच्या कमानीचे उजव्या बाजूला व्यवस्था करण्यात आली आहे. महायुतीचे उमेदवार व कार्यकर्त्यांना वडगाव फाटा ते स्वराज नगरी मार्गे येवून माउंट सेंट अॅन स्कुल तळेगाव चाकण रोड तळेगाव या शाळेच्या पार्कीगमध्ये थांबण्याची व मैदानामध्ये पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
इतर अपक्ष उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्याकरीता दुय्यम निबंधक कार्यालयासमोरील अंतर्गत रोड लगत पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांना थांबण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालया जवळील मोकळ्या जागेत व्यवस्था करण्यात आली आहे.
कार्यकर्त्यांसाठी मुबलक पार्किंगची सोय...
भोसरी आणि पिंपरी मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसाठी राधा हॉटेलच्या मोकळ्या जागेमध्ये व न्याती शो-रूम ते पॅरादी हवेली अंडरपास दरम्यानचे सेवा रस्त्यावर वाहनांसाठी पार्कींगची व्यवस्था करण्यात आली आहे. म्हाळुंगे पोलीस चौकी ते बालेवाडी स्टेडियम मेनगेट दरम्यानच्या रोडवर कार्यकर्त्यांना थांबण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
राजवाडा गेट ते मुळा नदी ब्रिजपर्यंत सेवा रस्त्यावर महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांसाठी पार्कीगची व्यवस्था तसेच कार्यकर्त्यांना थांबण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. इतर पक्षाचे उमेदवार व कार्यकर्ते यांच्यासाठी म्हाळूंगे येथील नामदेवराव मोहोळ माध्यमिक विद्यालयात वाहनांसाठी पार्कीगची व्यवस्था करण्यात आली आहे.