संग्रहित छायाचित्र
मावळ मतदारसंघात मतदानकरून घेण्यासाठी चुरस होती. वडगाव, तळेगाव, लोणावळा या शहरी भागातून सकाळच्या टप्यात जास्त मतदान झाले, तर दुपारनंतर ग्रामीण भागातील केंद्रावर गर्दी होती. प्रमुख उमेदवारांनी सकाळीच मतदान करत केंद्रांना भेटी दिल्या. त्यामुळे सायंकाळी पाचपर्यंत मावळमध्ये ६४.४४ टक्के मतदान झाले होते.
मावळमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुनील शेळके व अपक्ष बापू भेगडे यांच्यात तुल्यबळ लढत आहे. मतदारसंघाचा बहुतांश भाग ग्रामीण आहे. बराचसा परिसर डोंगर-दऱ्यांचा दुर्गम आहे. तरीही शहरातील मतदारांच्या तुलनेत हा मतदार अधिक सजग असल्याचे दिसून येत आहेत.
शहराला जोडून असलेल्या मावळ विधानसभा मतदारसंघाचा बहुतेक भाग ग्रामीण आहे. बराचसा परिसर डोंगर-दर्यांचा दुर्गम असा आहे. तरीही शहरातील मतदारसंघाच्या तुलनेत मावळमधील मतदार अधिक सजग असल्याचे दिसून येत आहेत.
या मतदारसंघात सर्वांत कमी मतदान २००९ मध्ये चांगले मतदान झाले होते. तेही ६५.४१ टक्के इतके होते. मावळ मतदारसंघात २०१४ आणि २०१९ मध्ये ७१ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले आहे. मावळात २००९ मध्ये ६५.४१ टक्के, २०१४ मध्ये ७१.११ टक्के तर २०१९ मध्ये ७१.२१ टक्के मतदान झाले होते.