पिंपरी चिंचवड: हवेत विषारी पावडर सोडणाऱ्या कंपनीला नोटीस

महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून 'ना हरकत' प्रमाणपत्र न घेता पावडर कोटिंगचे काम करणाऱ्या मे. गुरुकृपा कोटस कंपनीला नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच उद्योग व्यवसाय चालवण्यासाठी आवश्यक त्या परवाने घेण्यात यावेत, तोपर्यंत आपली कंपनी बंद ठेवण्यात यावी, असा इशारा पर्यावरण विभागाकडून देण्यात आला आहे.

संग्रहित छायाचित्र

सीविक मिररच्या वृत्तामुळे सरकारी यंत्रणा झाल्या जागा, पर्यावरण विभागाकडून पुढील कारवाईसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र

महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून 'ना हरकत' प्रमाणपत्र न घेता पावडर कोटिंगचे काम करणाऱ्या मे. गुरुकृपा कोटस कंपनीला नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच उद्योग व्यवसाय चालवण्यासाठी आवश्यक त्या परवाने घेण्यात यावेत, तोपर्यंत आपली कंपनी बंद ठेवण्यात यावी, असा इशारा पर्यावरण विभागाकडून देण्यात आला आहे. या संदर्भात 'सीविक मिरर'ने ३१ मार्च रोजी 'चिखलीकरांच्या श्वासात विषारी काळी पावडर' या मथळ्याने बातमी देत नागरिकांच्या समस्येला वाचा फोडली होती. दरम्यान या वृत्ताची दखल घेत सरकारी यंत्रणा जाग्या झाल्या आहेत.  

चिखलीतील पवारवस्ती येथे पावडरने कोटिंग करणाऱ्या कंपनीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. दिवस-रात्र कंपनीच्या खिडकीद्वारे काळी विषारी पावडर बाहेर फेकली जात आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊन वातावरण प्रदूषित होऊ लागले होते. महापालिकेच्या सारथी वेबपोर्टलवर वायुप्रदूषणाबाबत करण्यात आली. चिखलीतील पवारवस्तीत गट नंबर १३६५ मध्ये मे. गुरुकृपा कोटस कंपनीकडून पावडर कोटिंगचे काम केले जाते. अनेक वर्षांपासून ही सुरू आहेत. या कंपन्यांच्या खिडकीद्वारे विषारी काळी पावडर बाहेर सोडण्यात येते. सदरील तक्रारीची महापालिका पर्यावरण विभागातील कर्मचाऱ्यांकडून घटनास्थळी जाऊन पाहणी करण्यात आली. त्या कंपनीतून निर्माण होणारी काजळीबाबत योग्य ती उपाययोजना न करता थेट बाहेर फेकली जात आहे.

तसेच या कंपनीकडून महापालिकेच्या पर्यावरण आणि उद्योग व्यवसाय चालवण्यासाठी कोणताही परवानगी, 'ना हरकत' प्रमाणपत्र घेतलेले नाही. यावरून हा उद्योग व्यवसाय अनधिकृतपणे चालवला जात आहे. महापालिकेकडून मे. गुरुकृपा कोटस यांना नोटीस बजावली आहे. ही नोटीस दिल्यानंतर त्या तारखेपासून आपली आस्थापना बंद ठेवण्यात यावी. सदरची आस्थापना चालवण्यासाठी शासनाने निर्धारित केलेल्या आवश्यक असणाऱ्या परवानग्या घेणे अनिवार्य राहणार आहे. तसेच आस्थापनेतून निर्माण होणारी काजळी वातावरणात मिसळणार नाही, याची योग्य ती काळजी घेऊन उपाययोजना करण्यात याव्यात.

महापालिकेकडून नोटीसद्वारे दिलेल्या सूचनांकडे आपण दुर्लक्ष करून आस्थापना सुरू ठेवल्यास महापालिका अधिनियम ३७६(अ) अन्वये योग्य कारवाई प्रस्तावित करण्यात येईल. तसेच सदर नोटीसला सात दिवसांच्या आत महापालिका पर्यावरण कार्यालयास खुलास सादर करावा, असे नोटीसद्वारे कळवले आहे.

काळी कोटिंग पावडर हवेत खिडकीद्वारे सोडून वातावरण प्रदूषित करणाऱ्या कंपनीला नोटीस बजावून खुलासा मागवला आहे. त्या पावडरीने चिखली परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोकादायक बनले होते. सदर कंपनीस शासनाच्या योग्य त्या परवानगी घ्याव्यात, कोटिंग पावडरवर उपाययोजना करावी, तसेच पुढील कार्यवाहीसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र पाठवले आहे.

- संजय कुलकर्णी, सह शहर अभियंता, पर्यावरण विभाग, महापालिका

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest