Pimpri Chinchwad News: स्थानिकांना मिळेनात नाट्यगृहांच्या तारखा

पिंपरी चिंचवड: शहरातील नाट्यगृहांमध्ये शनिवार, रविवार आणि सुटीचे दिवस मिळावेत यासाठी मराठी व्यावसायिक नाट्यव्यवस्थापन संघाच्या वतीने पिंपरी-चिंचवड महापालिकेला निवेदन देण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक कलाकारांची

संग्रहित छायाचित्र

शनिवार, रविवार आणि सुट्टीचे दिवस व्यावसायिक नाट्य व्यवस्थापन संघाकडून बुक, स्थानिक कलाकारांचे नाट्यप्रयोग खोळंबले

आता महापालिकेच्या नाट्यगृहांचे भाडेदर कमी झाल्यानंतर आम्ही स्थानिक संस्थांनी नाटकासाठी तारखांची मागणी केली असता सर्व तारखा बुक असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबई आणि बाहेरच्या व्यावसायिकांनी या तारखा घेतल्याचे समजते आहे. त्यामुळे स्थानिक कलाकारांनी नक्की प्रयोग करायचे कुठे, असा सवाल आहे. शहरातील स्थानिक नाट्यसंस्थांना महापालिकेने प्राधान्य द्यायला हवे. आम्हाला पुण्यात जाऊन प्रयोग करणे परवडणारे नाही.

पिंपरी चिंचवड: शहरातील नाट्यगृहांमध्ये शनिवार, रविवार आणि सुटीचे दिवस मिळावेत यासाठी मराठी व्यावसायिक नाट्यव्यवस्थापन संघाच्या वतीने पिंपरी-चिंचवड महापालिकेला निवेदन देण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक कलाकारांची अडचण झाली असून महत्त्वाचे दिवस व्यावसायिक संघाला दिले जाणार असतील तर आमचे नाट्यप्रयोग कुठे सादर करायचे, असा संतप्त स्थानिक कलाकारांनी उपस्थित केला आहे. (Pimpri Chinchwad News)

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराचे (Balgandharva Rangmandir) अंतर्गत बांधणीचे काम येत्या १६ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत पुण्यातील प्रयोगांचा ताण देखील चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहावर (Pradhyapak Ramkrishna More Sabhagriha) येत आहे. अशातच तारखा आधीच बुक असतील तर शहरातील संस्थांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील नाट्य कलाकारांना चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात तारीख मिळवणे .........जिकीरीचे झाले आहे. व्यावसायिक संस्थांनी तिमाही तारखा बुकिंगवेळीच सर्व शनिवार-रविवार बुक केल्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांनादेखील तारखा मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. या संदर्भात विचारणा केली असता व्यावसायिक संघटनांचे म्हणणे आहे की, शहरातील तसेच शहराबाहेरील नाट्यसंस्थांनाच शनिवार, रविवार मिळावा असा हेतू समोर ठेवत आम्ही महापालिकेला पत्र दिले आहे. प्रत्यक्षात मात्र शहरातील स्थानिक संस्थांना नाट्यगृहात गेल्यानंतर तारखा मिळत नाहीत. त्यामुळे या तारखा फक्त व्यावसायिक नाट्यव्यवस्थापन संघांसाठीच आहेत का, असा संभ्रम निर्माण झाला आहे.

वारंवार निवेदने आणि बैठका घेऊन स्थानिक कलाकारांनी महापालिका प्रशासनासमोर आपल्या अडचणी मांडल्या आहेत. मात्र अनेकदा व्यावसायिक कलाकार प्रशासकांच्या पातळीवर दबाव आणतात. यामुळे स्थानिकांचा आवाज दाबला जात असल्याची स्थानिक कलाकारांची प्रतिक्रिया आहे. यावर महापालिकेनेच तोडगा काढण्याची मागणी स्थानिक करत आहेत. चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहावर नेहमीप्रमाणे ताण आहेच. यातच आता शाळा-महाविद्यालयांचे वार्षिक स्नेहसंमेलन असल्याने कार्यक्रमांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आता कोणीही विचारणा केली तरीही मार्चपर्यंत बुकिंग आहे, असेच उत्तर दिले जात आहे.

 

 

शहरातील सर्व थिएटरमध्ये शनिवार, रविवार आणि सुटीच्या दिवशी नाटकांच्या प्रयोगांना प्राधान्य देणार आहोत. सुटीच्या दिवशी अधिकाधिक नाट्यप्रयोग व्हावेत असा हेतू आहे. आतापर्यंत माझ्याकडे व्यावसायिक संघटनांचे कोणतेही निवेदन प्राप्त झाले नाही.

-शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक,

 पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

 

नाट्यप्रयोगांना प्राधान्य मिळावे या अनुषंगाने आम्ही पत्र दिले आहे. शनिवार, रविवारी मोठ्या संख्येने प्रेक्षकवर्ग येत असल्याने याबाबतचे पत्र महापालिकेच्या संबंधित विभागाला दिले आहे.

-मंदार बापट, नाट्यव्यवस्थापक

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest