Pimpri Chinchwad News: त्याचा बाप माझे काम बघायला आला होता का?

पिंपरी चिंचवड: अजित पवार (Ajit Pawar) हे विकास कामाची पाहणी ठेकेदारांना सोबत घेऊन करतात, अशी टीका काल एका बहाद्दराने माझ्यावर केली. त्यांचा बाप माझे काम बघायला आला होता का?, सकाळी सहाला विकास कामाची पाहणी करतो.

Ajit Pawar

उपमुख्यमंत्री अजित पवारांची जीभ घसरली, कोण ‘मायचा लाल’ सकाळी सहाला कामाची पाहणी करत नाही

उपमुख्यमंत्री अजित पवारांची जीभ घसरली, कोण ‘मायचा लाल’ सकाळी सहाला कामाची पाहणी करत नाही

(विकास शिंदे)
पिंपरी चिंचवड: अजित पवार (Ajit Pawar) हे विकास कामाची पाहणी ठेकेदारांना सोबत घेऊन करतात, अशी टीका काल एका बहाद्दराने माझ्यावर केली. त्यांचा बाप माझे काम बघायला आला होता का?, सकाळी सहाला विकास कामाची पाहणी करतो. कोण मायचा लाल करत नाही, अशा शब्दांत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.   (Pimpri Chinchwad News)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आणि चिन्ह मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आज पिंपरी-चिंचवड शहराच्या दौऱ्यावर‌ होते. यावेळी सांगवीतील जाहीर कार्यक्रमात त्यांची जीभ घसरली आहे. त्यांनी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचा थेट बाप काढला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध विकासकामांचे उद्घाटन शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. यावेळी आमदार अश्विनी जगताप, आमदार अण्णा बनसोडे, आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजय खोराटे, उल्हास जगताप, माजी महापौर योगेश बहल, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट, नाना काटे, प्रशांत शितोळे, मयूर कलाटे आदी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले की, मी भल्या सकाळी काम करतो, तसं कोणता ‘माय का लाल’ असं काम करतो, ते दाखवा. पण तुमच्याच इथला एक दीड शहाणा म्हणतो, मी सकाळी सहा वाजता ठेकेदारांची कामं करायला उठतो. त्याला म्हणावं तुझ्या बापाने मला तसं करताना पाहिलं होतं का?, अशी टीका अजित पवारांनी केली. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी काल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोर अजित पवारांवर अशी टीका केली होती. त्याला उत्तर देताना अजित पवारांची अशी जीभ घसरली आहे.

पवार पुढे म्हणाले की,  मला विकास करायचा, मला वायफळ बडबड करायची सवय नाही. त्यामुळे कोणत्याही सोम्या-गोम्याच्या टीकेला उत्तर द्यायला मी बांधिल नाही. विकासासाठी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री झालो. विकास कामे जोरात सुरू झाली. विकासाचे घेणे-देणे नाही, ते लोक विकासाला विरोध करत असतात.

आम्ही विकासासाठी सत्तेत आलो आहोत. आम्ही काय विकास केलाय तो तुम्ही प्रत्यक्ष जाऊन बघा. नागरिकांनी सर्व क्षेत्रात म्हणजे सामाजिक, शैक्षणिक योगदान दिले पाहिजे. सध्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रशासन आहे. त्यामुळे आयुक्तांनी जास्तीत जास्त विकास कामे काढून शहराचा दर्जा सुधारण्यावर भर द्यावा, असाही सल्ला अजित पवार यांनी दिला.

विकासासाठी भाजपबरोबर गेलो

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर जागतिक पातळीवर पोहोचलेलं शहर आहे. पिंपरी-चिंचवडचं आणि माझं जुनं नातं आहे. विकास कामे करण्यासाठी मी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री झालो. त्यामुळे रखडलेली कामे मार्गी लागत आहेत. पुण्यातील विमानतळाच्या कामाची पाहणी केली. पूर्वेकडे पण, धावपट्टीसाठी जागा भूसंपादन करणार आहोत. नव्या विमानतळाचा फायदा पश्चिम महाराष्ट्रासह नगर जिल्ह्यालाही होणार आहे. तसेच महापालिका निवडणुकीसाठी एससी आणि एसटीसाठी आरक्षण आहे. मात्र, ओबीसीवर अन्याय होत असल्याने ते कोर्टात गेले आहेत. त्यांचा निकाल लागेपर्यंत निवडणुका लांबणीवर पडली आहे.  चाकण, खेड, आळंदी ही नवीन महापालिका करावी लागणार आहे. त्याचे प्लॅनिंग सुरू आहे. असेही अजित पवार म्हणाले .

काय म्हणाले होते तुषार कामठे...?

“अजित पवार नेहमी  म्हणतात पहाटे उठून कामाला लागतो. शहराचा विकास केलाय. त्या अजित पवार यांनी केवळ ठेकेदारांचा आणि त्यांच्या विचारांच्या लोकांचा विकास केलाय. ते पहाटे त्यांना भेटायला जायचे. पिंपरी-चिंचवड शहरात कोणी लक्ष दिलं तर त्यांना आवडत नसायचं. साधा फ्लेक्सवरील फोटोवरून ते विचारणा करायचे” असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पिंपरी-चिंचवडचे शहvराध्यक्ष तुषार कामठे यांनी केले होते. त्याला उत्तर देताना  अजित पवार यांची जीभ घसरली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest