Pimpri Chinchwad News: बीआरटी मार्गातील त्रुटी तातडीने करणार दूर

पिंपरी-चिंचवड: शहरातील बीआरटी मार्गातील समस्या व त्रुटी दूर करण्यासाठी महापालिकेने काम हाती घेतले आहे. शहरातील चारही बीआरटी मार्गांतील तुटलेले बॅरिकेड्स, दुभाजक आणि खड्ड्यांचीही दुरुस्ती केली जाणार आहे.

संग्रहित छायाचित्र

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने देखभाल दुरुस्तीचे काम हाती, 'सीविक मिरर' च्या वृत्तानंतर पालिकेला आली खडबडून जाग

पिंपरी-चिंचवड: शहरातील बीआरटी मार्गातील समस्या व त्रुटी दूर करण्यासाठी महापालिकेने काम हाती घेतले आहे. शहरातील चारही बीआरटी मार्गांतील तुटलेले बॅरिकेड्स, दुभाजक आणि खड्ड्यांचीही दुरुस्ती केली जाणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) बीआरटी (BRT) विभागाने याला दुजोरा दिला आहे. 'सीविक मिरर' ने या विषयाला वाचा फोडली होती. या वृत्तानंतर महापालिकेस जाग आली. (Pimpri Chinchwad News)

'बीआरटी मार्गाला अडथळ्यांची शर्यत ' या मथळ्याखाली 'सीविक मिरर' मध्ये बुधवारी (७ फेब्रुवारी) सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यामध्ये प्रामुख्याने सांगवी ते किवळे या मार्गातील समस्या मांडल्या होत्या. त्याचा फटका प्रवाशांना बसत असून,  बीआरटी मार्ग अधिक अडचणीचा ठरला होता. दरम्यान या वृत्ताची दाखल घेऊन खडबडून जागे झालेल्या पीएमपीएमएल प्रशासनातील बीआरटी विभाग आणि महापालिका या दोन्हीकडून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. महापालिकेच्या वतीने या मार्गातील त्रुटी दूर करण्यासाठी पाहणी केली. 

त्यानुसार तुटलेले दुभाजक, बॅरिगेट्स आणि रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्यात आली आहे. शहरात होणाऱ्या चारही बीआरटी मार्गातील असलेल्या त्रुटी दूर करण्यात येणार आहे  दुभाजक तुटल्याने बीआरटी मार्गामध्ये जनावरे शिरतात. यामुळे अनेकदा छोटे मोठे अपघातही झाले आहेत. तसेच, माती व खडीही मार्गावर पडतात त्यामुळे अपघात धोका वाढला होता. त्याही दूर करण्यात येणार आहेत.

मार्गात बसणार कॅमेरे

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील बीआरटीचे जवळपास ९२ स्थानके आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ८० स्थानकांवर स्मार्ट कॅमेरे बसवण्यात येणार असून, त्याद्वारे नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. बीआरटी मार्गात घुसणाऱ्या खासगी वाहनांनाही चाप बसेल. पीएमपी आगारात त्याचे साहित्य आले असून लवकरच ते बसवण्यात येतील.

निगडी ते दापोडी बीआरटी होणार बदल ?

शहरातील प्रमुख बीआरटी मार्ग पैकी एक असलेल्या निगडी ते दापोडी या मार्गात अनेक बदल केले जाणार आहेत. त्यानुसार महापालिकेने नव्याने आराखडा तयार केला असून, अद्याप त्याची अंमलबजावणी झाली नाही. पीएमपी प्रशासनास याबाबत त्यांनी सांगून अनेक महिने उलटले आहेत. तूर्तास त्यामध्ये कोणताही बदल झाला नाही.

शहरातील बीआरटी मार्गाची देखभाल दुरुस्ती अंतर्गत कामे सुरू करण्यात आली आहेत. इतरही काही त्रुटी दूर करण्यात येतील

-प्रमोद ओंबासे, सह शहर अभियंता , बीआरटी 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest