Pimpri Chinchwad News: कोणावरही झालेला हल्ला खपवून घेतला जाणार नाही - अजित पवार

पुणे: महायुती सरकार हे शाहू-फुले-आंबेडकरांना आणि लोकशाहीला मानणारे सरकार आहे. या सरकारमध्ये कोणावरही झालेला हल्ला अजिबात खपवून घेतला जाणार नाही. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे (Attack on Nikhil Wagle) यांच्यावर

Attack on Nikhil Wagle

संग्रहित छायाचित्र

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर झालेल्या हल्ल्यांसंदर्भात उपमुख्यमंत्र्यांची भूमिका

पुणे: महायुती सरकार हे शाहू-फुले-आंबेडकरांना आणि लोकशाहीला मानणारे सरकार आहे. या सरकारमध्ये कोणावरही झालेला हल्ला अजिबात खपवून घेतला जाणार नाही. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे (Attack on Nikhil Wagle) यांच्यावर झालेल्या हल्ल्यांसंदर्भात लगेच पुण्याच्या पोलीस आयुक्तांशी बोलून दोषींवर कारवाई करायला लावणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) विविध विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अजित पवार म्हणाले, भविष्यात नियोजित विकास काम जर आज कर्ज काढून कमी पैशात होत असतील तर ते करायला हरकत नाही. राज्य सरकारनेदेखील समृद्धी महामार्ग कर्ज काढून तयार केला आणि आज त्यातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते.

मुंबई - पुणे एक्सप्रेस वे देखील कर्ज काढून तयार झाला आणि त्याला बनवायला लागले त्याच्या कित्येक पटीने पैसे परत मिळाले आहेत. मात्र, मिळालेल्या पैशातून आम्ही दुसरे रस्ते बांधत आहोत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका जर कर्ज घेत असेल तर ते नियमाला धरून असायला हवे. कर्जाचा ताण महापालिकेवर यायला नको. त्यासंबंधी नगर विकास खाते आणि अधिकारी योग्य ती काळजी घेतील, असेही पवार म्हणाले.

टीडीआरची किंमत वाढणार नाही

टीडीआर घोटाळ्यावर अजित पवार म्हणाले, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या टीडीआर घोटाळ्यात बरीच अनियमितता होती. त्यामुळे मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोटाळ्याला स्थगिती दिली होती. टीडीआर घोटाळ्याला स्थगिती दिल्यामुळे त्या प्रकल्पाची किंमत वाढणार नाही. 

शिरूरमध्ये महायुतीचाच उमेदवार 

लोकशाहीत  निवडणुकीमध्ये प्रत्येकाला उमेदवार देण्याचा हक्क असतो. त्यामुळे शिरूर लोकसभा निवडणुकीतदेखील विरोधकांचा उमेदवार असणार आहे. मात्र, तिथे महायुतीचाच उमेदवार विजयी होणार आहे. सध्या देशात मोदींच्या नेतृत्वावर लोकांचा प्रचंड विश्वास आहे आणि ते तिसऱ्यांदा पुन्हा पंतप्रधान होतील.

चाकणकरांनी पोलिसांना पत्र दिले 

क्रिएटिव्ह अकॅडमीच्या नौशाद शेख याच्या अत्याचाराला बळी पडलेल्या अल्पवयीन पीडितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र, पिंपरी-चिंचवडमध्ये आलेल्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना या अल्पवयीन पीडितांचा आक्रोष ऐकायलाच गेला नसल्याचे दिसून येते. आठवडाभरापासून पुण्यात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये असतानाही चाकणकरांनी ना अकॅडमीला भेट दिला ना पोलिसांना बोलावून घेत प्रकरणाची माहिती घेतली. या प्रकरणावरून चाकणकर सत्ता सोहळ्यात व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे, या आशयाची बातमी ‘सीविक मिरर’मध्ये प्रसिद्ध झाल्यावर शहरात याची जोरदार चर्चा झाली. त्यावर स्पष्टीकरण देत, चाकणकर यांनी पोलिसांना पत्र दिले आहे. त्यांचे तपासावर लक्ष आहे असे यावेळी सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest