"अबकी बार ४०० पार" ला चिंचवडमध्ये फासले काळे
पिंपरी चिंचवड: भाजपने शहरात विविध ठिकाणी "अबकी बार ४०० पार" आणि पक्ष चिन्ह रंगवले होते. यातील केशवनगर, चिंचवड येथील गणेश विसर्जन घाटाजवळ एका सोसायटीच्या भिंतीवर देखील पक्षाचे चिन्ह असलेला मजकूर रंगविण्यात आला होता. मात्र अज्ञाताने या जाहिरातीवर काळ्या रंगाने रंगविण्यात आले आहे. तसेच केशवनगर, चिंचवड येथील गोयल गरीमा या सोसायटी बाहेर रंगविण्यात आलेल्या भाजपच्या जाहिरातीवरील चिन्हावर महापुरूषाचा फोटो लावण्यात आला आहे. याबाबत चिंचवड पोलिसांकडे माजी नगरसेवकाने तक्रार केली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.