Pimpri Chinchwad: प्राधिकरणात 'खिळेमुक्त झाड' अभियानास सुरुवात

पिंपरी-चिंचवड शहरातील झाडांवर मोठ्या प्रमाणात खिळे ठोकून जाहिरातबाजी होते. अलीकडच्या काळात हा प्रकार वाढत असून, या विरोधात सामान्य नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Nail Free Tree Campaign

प्राधिकरणात 'खिळेमुक्त झाड' अभियानास सुरुवात

शेकडो झाडांवरील खिळे काढले, शहरातील विविध ठिकाणी राबवणार उपक्रम

पंकज खोले
पिंपरी-चिंचवड शहरातील झाडांवर मोठ्या प्रमाणात खिळे ठोकून जाहिरातबाजी होते. अलीकडच्या काळात हा प्रकार वाढत असून, या विरोधात सामान्य नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, अंघोळीची गोळी या संस्थेने प्राधिकरण परिसरातून झाडांवरील खिळे काढण्याचा उपक्रम सुरू केला आहे. शहरातील अनेकांनीही आपल्या परिसरात हा उपक्रम राबवावा, असे या संस्थेकडून सुचवण्यात आले आहे. (Nail Free Tree Campaign)

अंघोळीची गोळी संस्थेच्या माध्यमातून पर्यावरणपूरक उपक्रमाअंतर्गत प्राधिकरण पोस्ट ऑफिस परिसरातील झाडांवरील खिळे, बॅनर, पोस्टर काढण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू केला. झाडांनाही संवेदना असतात, तेही सजीव आहेत. या उपक्रमाच्या माध्यमाने त्यांच्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न यातून होईल. या उपक्रमासाठी इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल अँड कॉम्प्युटर मॅनेजमेंट अँड रीसर्चमधील (आयआयसीएमआर) एमसीएच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. वृक्ष संवर्धन हेच हवामान बदलास उत्तर आहे. त्यामुळे खिळेमुक्त झाडे हा उपक्रम राबवताना खूप आनंद होत असल्याचे आयआयसीएमआरच्या विभाग प्रमुख रेणू मॅथ्यू म्हणाल्या.

पर्यावरण संरक्षण अधिनियम, महाराष्ट्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, महाराष्ट्र मालमत्तेच्या विद्रुपीकरणास प्रतिबंध करण्याकरिता अधिनियम आणि राष्ट्रीय ग्रीन ट्रिब्युनल यात झाडांसंदर्भात अनेक कायदे आणि नियम स्पष्टपणे अधोरेखित असले तरी आपल्याकडे ते पाळले जात नाहीत. त्यामुळे हे नियम अधिक प्रभावी कसे होतील यांसाठी आमचा प्रयत्न चालू असल्याचे अंघोळीची गोळी संस्थेचे अध्यक्ष माधव पाटील म्हणाले.  या उपक्रमात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभाग आणि कमिन्स इंडिया फाउंडेशनने देखील आपले योगदान दिले. या उपक्रमाचे आयोजन संस्थेच्या प्राध्यापिका वंदना पेडणेकर यांनी केले. यावेळी हर्षदा तळणीकर, प्रीता प्रसिध आणि संस्थेचे विद्यार्थी उपस्थित होते. दरम्यान, शहरातील विविध ठिकाणी अशाप्रकारे उपक्रम राबवणार आहे. त्यासाठी परिसरातील नागरिक अथवा संस्था-संघटनांनी एकत्र यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest