पिंपरी-चिंचवड: अनधिकृत होर्डिंगवर महापालिकेचा हातोडा, शहरातील २४ अनधिकृत होर्डिंग्जधारकांवर होणार गुन्हा दाखल

महापालिकेची परवानगी न घेता अनधिकृत होर्डिंग, जाहिरातफलक उभारण्यात आले आहेत. त्या होर्डिंग्जधारकांची शुक्रवारी (१७ मे) बैठक घेत अनधिकृत होर्डिंग काढून घेण्याच्या सूचना होर्डिंग मालकांना केल्या होत्या. मात्र, अनधिकृत होर्डिंगवर काढून न घेतल्याने सोमवारी अनधिकृत होर्डिंगवर कारवाईला महापालिकेने सुरुवात केली आहे.

अनधिकृत होर्डिंगवर महापालिकेचा हातोडा, शहरातील २४ अनधिकृत होर्डिंग्जधारकांवर होणार गुन्हा दाखल

मोशीतील पाच होर्डिंग हटवले

विकास शिंदे

महापालिकेची परवानगी न घेता अनधिकृत होर्डिंग, जाहिरातफलक उभारण्यात आले आहेत. त्या होर्डिंग्जधारकांची शुक्रवारी (१७ मे) बैठक घेत अनधिकृत होर्डिंग काढून घेण्याच्या सूचना होर्डिंग मालकांना केल्या होत्या. मात्र, अनधिकृत होर्डिंगवर काढून न घेतल्याने सोमवारी अनधिकृत होर्डिंगवर कारवाईला महापालिकेने सुरुवात केली आहे. त्यानुसार ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत मोशी भागात सायंकाळी पाचपर्यंत पाच मोठे होर्डिंग हटवण्यात आले आहेत.

मुंबईतील घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून झालेल्‍या दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर राज्‍यात अनधिकृत होर्डिंगचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. ही घटना ताजी असतानाच पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी येथे देखील होर्डिंग कोसळल्याची घटना घडली. मात्र, यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेनंतर महापालिका प्रशासनाने अनधिकृत धोकादायक होर्डिंगवरील कारवाईची गती वाढवली. महापालिकेच्या वतीने सर्वेक्षण करण्यात आले होते. यात शहरात अनधिकृत २४ होर्डिंग्ज सापडले होते. त्यांना नोटीस देत निष्कासित करण्याची कारवाई करण्यात येत आहे. तसेच अधिकृत जाहिरातफलक किंवा होर्डिंग लावताना फलकाच्या शेवटी नागरिकांसाठी सूचना लिहिणे गरजेचे आहे.  या सूचनांचा नमुना महापालिकेच्या आकाशचिन्ह परवाना विभागाच्या वतीने फलकधारकांना देण्यात येईल.

होर्डिंगच्या खाली टपरी, दुकान किंवा अतिक्रमण केले गेले तर त्याबाबत फलकधारक किंवा जागा मालकांनी महापालिकेस कळवणे आवश्यक आहे. महापालिका संबंधित दुकान, टपरी किंवा अतिक्रमणावर निष्कासनाची कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, महापालिकेच्‍या ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या मोशी परिसरात कारवाईला सुरुवात करण्यात आली. चारपर्यंत तीन मोठे होर्डिंग हटविण्यात आले. मोशी येथील भारतमाता चौक, जुना जकात नाका, सस्‍तेनगर, पिंगळे खानावळ परिसरात कारवाई करण्यात आली. यामध्ये ३० फूट उंच, २० फूट रुंदीचे दोन, ४० फूट उंच, २० फूट रुंदीचे एक, १५ फूट उंच आणि २० फूट रुंदीचे एक होर्डिंग हटवण्याची कारवाई करण्यात आली आहे.

होर्डिंगधारकांना हे बंधनकारक...

शहरातील सर्व जाहिरात फलकधारकांनी परवाना दरवर्षी नूतनीकरण करणे आवश्यक आहे. दरवर्षी ३१ मार्चपर्यंत विहित वेळेत फलकधारकांनी परवान्याचे नूतनीकरण केले नसेल तर त्यांच्या परवान्याचे नूतनीकरण केले जाणार नाही. तसेच प्रत्येक फलकधारकाने संरचनात्मक लेखापरीक्षण प्रमाणपत्र (स्ट्रक्चरल ऑडिट सर्टिफिकेट) सादर करणे बंधनकारक आहे. जे फलकधारक प्रमाणपत्र सादर करणार नाहीत त्यांचा परवाना रद्द केला जाणार आहे. तसेच फलक उभारण्यात आलेल्या जागेवर संरचना अभियंत्याने पाहणी करून संरचनात्मक लेखापरीक्षण प्रमाणपत्र द्यावे. जाहिरात फलकाची संरचना गंजू नये किंवा कमकुवत होऊ नये यासाठी संरचना पेंटिंग करणे बंधनकारक असणार आहे.

अनधिकृत होर्डिंगचे शहरातील सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. शहरात २४ होर्डिंग अनधिकृत सापडले आहेत. त्यांच्यावर सोमवारपासून कारवाईला सुरुवात केली आहे. आज मोशी भागातील चार होर्डिंग काढण्यात आले. तसेच त्या होर्डिंगधारकांवर गुन्हाही दाखल करण्यात येत आहे.
- संदीप खोत, उपायुक्त,महापालिका, पिंपरी-चिंचवड 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest