Pimpri Chinchwad: अयोध्येकडे जाणाऱ्या गाडीत मोबाईलचा स्फोट

पिंपरी चिंचवड: रामलल्लाच्या (Ramlalla) दर्शनासाठी पुणे येथून अयोध्येकडे निघालेल्या 'आस्था' स्पेशल ट्रेनमध्ये (Aastha Speacial Train) चिंचवड ते देहूरोड रेल्वे स्थानकादरम्यान (Dehu Road) मंगळवारी (६ फेब्रुवारी) रात्री आठच्या सुमारास

संग्रहित छायाचित्र

चिंचवड ते देहूरोड दरम्यान 'आस्था' स्पेशल गाडीतील घटना; अतीवरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली पाहणी

पिंपरी चिंचवड: रामलल्लाच्या (Ramlalla) दर्शनासाठी पुणे येथून अयोध्येकडे निघालेल्या 'आस्था' स्पेशल ट्रेनमध्ये (Aastha Speacial Train) चिंचवड ते देहूरोड रेल्वे स्थानकादरम्यान (Dehu Road) मंगळवारी (६ फेब्रुवारी) रात्री आठच्या सुमारास अचानक एक मोबाईल फुटला. यामुळे मोबाईलला आग लागल्याने गोंधळ उडाला. मोबाईल बाहेरून फेकण्यात आल्याची अफवा पसरल्याने काही काळ सर्वांचीच तारांबळ उडाली. पण मोबाईल चार्जिंगला लावला असताना फुटल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. (Pimpri Chinchwad News)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे येथून रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येकडे 'आस्था' स्पेशल ट्रेन सोडण्यात आली होती. ही ट्रेन चिंचवड स्थानकातून ७:२५ वाजता मार्गस्थ होत असताना ७:५२ ते ७:५९ वाजण्याच्या दरम्यान चिंचवड ते देहू रोड रेल्वेस्थानकादरम्यान बोगी क्रमांक २० मध्ये अचानक मोबाईलचा स्फोट झाला. या रेल्वेतील प्रवासी महिला छाया हरिभाऊ काशिद (धनकवाडी, पुणे) यांनी हा मोबाईल फुटल्याचे सर्वप्रथम पहिले. सुरुवातीला हा मोबाईल कोणीतरी बाहेरून फेकला असल्याची चर्चा सुरू झाल्याने एकच गोंधळ उडाला.

या रेल्वेच्या बोगी क्रमांक १८ मध्ये रेल्वे सुरक्षा दलाचे जवान होते. गोंधळाचा आवाज एकून त्यांनी बोगी क्रमांक २० मध्ये धाव घेतली. तत्काळ मोबाइलला लागलेली आग विझवण्यात आली. या जवानांनी चौकशी करीत प्रवाशांना शांत केले. तोपर्यंत रेल्वे लोणावळा स्थानकात पोहचली. तेथून या घटनेची माहिती पुणे आणि ठाणे पोलिसांना देण्यात आली. रेल्वे घाट उतरून पुढे गेल्यावर, पनवेल स्थानकात रेल्वेचे ठाणे विभागाचे पोलीस अधीक्षक यांनी 'आस्था' स्पेशल ट्रेनमध्ये जाऊन पाहणी केली. यावेळी पनवेल रेल्वे स्थानकात पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तेथे रात्री १०:२२ वाजता जळालेला मोबाइल ताब्यात घेण्यात आला. त्यांनतर काशीद आणि अन्य प्रवाशांना कोणतीही इजा झाली नसल्याची खात्री करून, प्रवासी महिला काशीद आणि अन्य प्रवाशांचे जबाब घेण्यात आल्यावर आस्था स्पेशल ट्रेन पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली.

दुसऱ्या दिवशी सकाळपासून पुणे रेल्वेच्या अति वरिष्ठ अधिकाऱ्यांसह, रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी चिंचवड ते देहूरोड या रेल्वे मार्गावर प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच या घटनेनंतर मंगळवारी रात्री या मार्गावर रेल्वेचे पोलीस कर्मचारी तैनात करून, तपासणी केली गेली. याठिकाणी पोलिसांनी केलेल्या दोन दिवसांच्या पाहणीत कोणतीही संशयास्पद वस्तू अथवा प्रकार आढळून आलेला नाही, असे एका अधिकाऱ्याने 'सीविक मिरर'शी बोलताना सांगितले.

 

मोबाईल अधिक चार्जिंग केल्याने गरम होऊन फुटल्याची प्राथमिक शक्यता फॉरेन्सिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. घटनास्थळाची पाहणी करण्यात आली असून, कोणताही संशयास्पद प्रकार आढळून आलेला नाही. तसेच यामध्ये कोणी जखमी झालेले नाही. रेल्वेच्या बोगीत कोणतेही नुकसान झालेले नाही. याबाबत गुन्हा दाखल करून, तपास सुरू करण्यात आला आहे. प्रवासी सुखरूपपणे पुढील प्रवासाला रवाना झाले आहेत.

-तुषार दोषी, पोलीस अधीक्षक, पुणे रेल्वे

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest