पिंपरी-चिंचवड: महावितरणच्या नावाने ‘महामृत्युंजय मंत्र’

भ्रष्ट्राचारी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, तसेच रोहित्रावर (यमरूपी ‘डीपी’) दिलेल्या अनावश्यक लोडपासून नागरिकांचे रक्षण व्हावे, यासाठी तळवडे त्रिवेणीनगर येथील ‘ओव्हरलोड अशोक पवार डीपी ’ येथे शुक्रवारी रहिवासी नागरिक आणि शिवसेना तळवडे शाखेच्यावतीने ‘महामृत्युंजय मंत्र आणि अनुष्ठान पुजे’चे आयोजन करण्यात आले होते.

पिंपरी-चिंचवड: महावितरणच्या नावाने ‘महामृत्युंजय मंत्र’

भ्रष्ट अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी, रोहित्रावरील अतिरिक्त वीजभाराने नागरिक संतापले

पंकज खोले

भ्रष्ट्राचारी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, तसेच रोहित्रावर (यमरूपी ‘डीपी’) दिलेल्या अनावश्यक लोडपासून नागरिकांचे रक्षण व्हावे, यासाठी तळवडे त्रिवेणीनगर येथील ‘ओव्हरलोड अशोक पवार डीपी ’ येथे शुक्रवारी रहिवासी नागरिक आणि शिवसेना तळवडे शाखेच्यावतीने  ‘महामृत्युंजय मंत्र आणि अनुष्ठान पुजे’चे आयोजन करण्यात आले होते. परीसरातील सर्व नागरिकांनी एकत्रित येत घोषणा देऊन महावितरणाच्या अजब कारभाराचा निषेध नोंदविला.

महावितरणच्या प्राधिकरण सब डिव्हिजनमधील अतिरिक्त कार्यकरी अभियंता आणि दोन सहायक अभियंत्यांनी रूपी नगर येथील दोनशे केव्ही क्षमतेच्या रोहित्रावर पाचशे केव्ही क्षमतेचा लोड टाकला. एका इमारतीसाठी याचा लोड फक्त ६५ केव्ही क्षमतेचा असल्याचे भासवत त्याच्यवर आणखी १०० केव्ही क्षमतेचा वीजभार टाकला. यातून मोठा आर्थिक भ्रष्टाचार उघडकीस आला. तळवडे शाखा कार्यालयाचे तत्कालीन सहायक अभियंते रमाकांत गर्जे यांनी आणखी एका इमारतीमध्ये पाच लाखांचा महसूल बुडविला आहे. तो भ्रष्टाचार पिंपरी चिंचवड इलेक्ट्रीकल कॉन्ट्रॅक्ट असोसिएशनने उघडकीस आणला होता. 

दरम्यान, भ्रष्टाचार उघडकीस येऊनदेखील महावितरण दोषी अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहे. आर्थिक लागेबांधे जोपासत आहे. नागरिकांच्या मुळावर उठलेल्या या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले पाहिजेत. त्यासाठी आम्ही प्रसंगी रस्त्यावर उतरू, असा इशारा यावेळी देण्यात आला. 

असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश बक्षी म्हणाले, या अति धोकादायक रोहित्रामुळे परिसरातील नागरिकांना मोठा धोका आहे. हा रहदारीचा रस्ता आहे. शेजारीच शाळा आहे. रोहित्राचा स्फोट झाल्यास त्यांच्या जीविताला धोका पोहोचू शकतो. महावितरण याकडे कानाडोळा करीत आहे. 

संतोष सौंदणकर म्हणाले, महावितरणने भ्रष्ट दोषी अधिकाऱ्यावर तब्बल पंधरा दिवसाने निलंबनाची कारवाई केली. अद्याप त्याच्यावर भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यानंतरही या अधिकाऱ्याला वाचविण्यासाठी महावितरणचे अधिकारी एकत्र आले. पाच लाखाचे नुकसान करूनही या अधिकाऱ्याला वाचविण्यासाठी सर्व अधिकारी एकत्र आले. उपमुख्यमंत्री आणि उर्जामंत्री यांनी हा विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. निलंबित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करावा अन्यथा आम्ही कोर्टात जावू.

..अन् घटनास्थळी आले अधिकारी 

यावेळी भोसरी महावितरणचे कार्यकारी अभियंता देवकर यांनी तेथे धाव घेतली आणि हा प्रकार थांबवा, अशी विनंती केली. मुख्य अभियंत्यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे.  शाखा अभियंत्यांना निलंबित केले आहे. चौकशी सुरु आहे. चौकशी झाल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल. अधिकाऱ्यांना नियमात राहूनच काम करावे लागेल. नियमबाह्य कामे करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. रोहीत्रावरील लोड आठ दिवसात नियमित करू, असे आश्वासन यावेळी दिले.''

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest