पिंपरी-चिंचवड: जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिमेला 'जोडे मारो' आंदोलन

राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहर भाजप आक्रमक झाले.

Jitendra Awhad

पिंपरी-चिंचवड: जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिमेला 'जोडे मारो' आंदोलन

आव्हाडांनी हेतुपूर्वक केला महामानवाचा अपमान, आव्हाड समाजात तेढ निर्माण करत असल्याचा भाजपचा आरोप

विकास शिंदे

राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहर भाजप आक्रमक झाले. अनुसूचित जाती मोर्चा तर्फे पिंपरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या पुतळ्यास अभिवादन करून आव्हाड यांच्या प्रतिमेला 'जोडो मारो' आंदोलन करण्यात आले.

शहराध्यक्ष शंकर जगताप (Shankar Jagtap) म्हणाले की, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आव्हाड यांनी अपमान केला आहे, महामानवांचा अवमान खपवून घेणार नसून, आव्हाड यांसारख्या वृत्तींना वेळीच ठेचून त्यांच्या पक्षाने आव्हाडांवर कारवाई करावी. तसेच, त्यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच आमदार आव्हाड यांनी मागील काही दिवसांपूर्वी महिला आणि  महापुरुषांबद्दल अपशब्दांचा वापर केला होता. भगवान श्रीराम यांच्याबद्दलही अपशब्दांचा वापर केला होता. अशा वक्त्याद्वारे समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम आव्हाड यांच्याकडे वारंवार सुरू आहे.

त्यांच्या पक्षाकडून याबाबत कुठलीही दखल घेतली जात नसल्याने त्यांच्या पक्षश्रेष्ठींकडून या घटनेचे समर्थन होत असल्याचे दिसून येते. महाराष्ट्रातून या घटनेचा खेद व्यक्त होत असून, याची वेळीच दखल न घेतल्यास भाजपा कार्यकर्ते जितेंद्र आव्हाड यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा जगताप यांनी दिला. प्रदेश उपाध्यक्ष अमर साबळे, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष भीमा बोबडे, महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे यांनी देखील मत व्यक्त करून या घटनेचा निषेध नोंदविला. दक्षिण आघाडी प्रदेश अध्यक्ष राजेश पिल्ले यांनी आव्हाड यांच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करणार असल्याचे यावेळी जाहीर केले. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात घोषणाबाजी देण्यात आली. तसेच, त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून या घटचेना निषेध नोंदवण्यात आला. (Pimpri-Chinchwad BJP)

या आंदोलनात सरचिटणीस संजय मंगोडेकर, वरिष्ठ उपाध्यक्ष राजू दुर्गे, शैला मोळक, माजी महापौर आर.एस.कुमार, मंडल अध्यक्ष सोमनाथ भोंडवे, नीलेश अष्टेकर, अनुसूचित जाती मोर्चा प्रदेशचे मनोज तोरडमल, धनराज बिरदा, अजित कुलथे, वैशाली खाडये, शिवदास हांडे, दीपक भंडारी, संतोष रणसिंग, बाळासाहेब भुंबे, डॉ. संतोष शिंदे, नंदू कदम, सचिन उदागे, देवदत्त लांडे, रवींद्र वायसे, नंदू भोसले, महेश बारसावी, मा. नगरसेवक माउली थोरात, बाळासाहेब त्रिभुवन, सागर आंघोळकर, अनुराधा गोरखे, गोपाळ माळेकर, ॲड. दत्ता झुळूक, मंजू गुप्ता, प्रीती कामतीकर, अमेय देशपांडे, सीमा चव्हाण, अश्विनी कांबळे, पल्लवी पाठक, ‍दीपाली कलापुरे, शोभा थोरात, मनोज ब्राम्हणकर, युवराज ढोरे, दत्तात्रय ढगे, समीर जवळकर, ॲड. गोरक्षनाथ झोळ, गणेश ढाकणे, प्रतिभा जवळकर, आरती सोनवणे, सीमा बोरसे यांच्यासह विविध आघाड्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बाबासाहेब हे प्रत्येक भारतीयांचे आदर्श आहेत. आदर्श महापुरुषाचा हा अवमान आम्ही कदापिही खपवून घेणार नाही. या कृत्यावर आव्हाडांच्या मनात परमपूज्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल किती श्रद्धा आणि निष्ठा आहे हे दिसून येते. स्वतःला पुरोगामी म्हणायचे आणि असे कृत्य करायचे हे शोभनीय नाही. या निमित्ताने त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे. त्यांचा आम्ही जाहीर निषेध केला आहे.
- शंकर जगताप - शहराध्यक्ष, पिंपरी-चिंचवड भाजप

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest