पिंपरी-चिंचवड: आता 'सारथी'वर स्थानिक कंपन्यांची माहिती

महापालिकेच्या पीसीएमसी स्मार्ट सारथी अॅपवरील जॉब पोर्टलवर शहरातील रोजगार संधीची माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील कंपन्यांनी आपल्याकडील रिक्त जागेची माहिती यात देण्यासाठी पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेने पुढाकार घेतला आहे.

PCMC News

संग्रहित छायाचित्र

पंकज खोले

महापालिकेच्या पीसीएमसी स्मार्ट सारथी अॅपवरील जॉब पोर्टलवर शहरातील रोजगार संधीची माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील कंपन्यांनी आपल्याकडील रिक्त जागेची माहिती यात देण्यासाठी पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेने पुढाकार घेतला आहे. या जॉब पोर्टलमुळे रोजगाराच्या शोधात असणारे नागरिक आणि शहरातील आस्थापना यांच्या दरम्यान एक सेतू निर्माण होणार असल्याची 'आशा' संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी व्यक्त केली.

पीसीएमसी स्मार्ट सारथी हे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड यांचे अधिकृत मोबाईल अॅप आहे. या अॅप अंतर्गत नागरिकांसाठी 'जॉब पोर्टल' ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. संबंधित जॉब पोर्टलवर शहरातील रोजगार संधींची माहिती प्रसिद्ध करण्यात येणार आहे. हे जॉब पोर्टल केवळ रोजगाराची माहिती देणारे पोर्टल आहे. जॉब पोर्टलमुळे नागरिकांना रोजगाराची माहिती सुलभपणे उपलब्ध होऊन रोजगार निर्मिती होईल. तसेच विविध आस्थापनांना कुशल मनुष्यबळ मिळण्यासाठी देखील साहाय्य होणार आहे. त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था बळकट होण्यास मदत मिळणार आहे. प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या  माहितीस संबंधित कंपनी सर्वस्वी जबाबदार असणार आहे.

पिंपरी चिंचवड शहरात शेकडो लघुउद्योजक आहेत. या उद्योजकांना विविध पदांसाठी नेहमी मनुष्यबळाची गरज भासते. त्यामुळे जिल्ह्याच्या बाहेर विविध कामगार येथे येतात. मात्र, याची माहिती शहरातील नागरिकांना मिळाल्यास शहरातच मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. त्याचा फायदा शहरातील रोजगार शोधणाऱ्या तरुणांना होणार आहे. त्यासाठी  उद्योजकांनी आपणाकडे उपलब्ध असलेल्या नोकऱ्यांच्या रिक्त जागांची माहिती द्यावी, असे आवाहन पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, सचिव जयंत कड यांनी केले आहे.या रिक्त जागा पिंपरी चिंचवड स्मार्ट सारथी जॉब पोर्टलवर प्रसिद्ध केल्या जातील. ज्यामुळे ही माहिती व्यापक स्वरूपात नागरिकांपर्यंत पोहोचेल आणि भरती प्रक्रिया सुलभ होईल. हा उपक्रम सुलभ करण्यासाठी एकूण पदांची संख्या, पदांची नावे, कंपनीचे नाव, संपर्क व्यक्तीचे नाव, ई-मेल आयडी, एकूण रिक्त पदे, कामाचे स्वरूप, रिक्त पदाची प्रारंभ तारीख आणि शेवटची तारीख आदी माहिती पीडीएफ स्वरूपात cep@pcmcindia.gov.in या ई-मेल आयडीवर पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

विविध आस्थापनांना कुशल मनुष्यबळ मिळण्यासाठी देखील यामुळे साहाय्य होणार आहे. या जॉब पोर्टलमुळे रोजगाराच्या शोधात असणारे नागरिक आणि शहरातील आस्थापना यांच्या दरम्यान एक सेतू निर्माण होणार आहे. त्यासाठी उद्योजकांना आवाहन केले आहे. यामुळे स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध होऊन शहराची अर्थव्यवस्था बळकट होण्यास मदत मिळणार आहे.
- संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटना

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest