Pimpri Chinchwad News: नागरिकांनीच केले भुयारी मार्गाचे लोकार्पण

रस्ता ओलांडताना ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांची होणारी धावपळ आणि सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा, यासाठी उभारण्यात आलेल्या भुयारी मार्गाचे अखेर स्थानिक ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते लोकार्पण करून तो सामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात आला.

Nigdi Subway

नागरिकांनीच केले भुयारी मार्गाचे लोकार्पण

अखेर निगडी येथील भुयारी मार्ग वापरासाठी खुला, भुयारी मार्गामुळे अपघातांना बसणार आळा

पंकज खोले
रस्ता ओलांडताना ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांची होणारी धावपळ आणि सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा, यासाठी उभारण्यात आलेल्या भुयारी मार्गाचे अखेर स्थानिक ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते लोकार्पण करून तो सामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात आला. निगडी (Nigdi) प्रभाग क्र १३  गावठाण येथील भुयारी मार्गाचे उद्घाटन तेथील स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.

 गेल्या अनेक वर्षांपासून भुयारी मार्ग करण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांसह विद्यार्थी व व्यापारी वर्गाची होती. या नुसार महानगरपालिकेकडे सातत्याने पाठपुरावा करून भुयारी मार्ग बनवण्यात आला. भुयारी मार्ग होण्यापूर्वी रस्ता ओलांडत असताना अनेक ज्येष्ठ नागरिक व महिलांना अपघाताला सामोरे जावे लागले होते. अपघातामध्ये अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांना हा रस्ता ओलांडणे धोकादायक होते. वाहने या मार्गावरून वेगात असल्याने अलीकडच्या काळात अपघातांचे प्रमाण देखील वाढले होते. यामुळे हा पूल उभारण्याबाबत नागरिकांनी पाठपुरावा केला होता.

त्यानुसार महापालिकेकडून निगडी येथे भुयारी मार्गाचे काम सुरू करण्यात आले. या पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेऊन या भुयारी मार्गाचे लोकार्पण केले. निगडीतील या भुयारी मार्गामुळे नक्कीच अपघातास आळा बसणार आहे. यामुळे येथील नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. माजी नगरसेवक सचिन चिखले, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रोहिदास शिवनेकर, देवेंद्र निकम, चंद्रकांत दानवले, खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तानाजी काळभोर, मारुती भापकर, राजेंद्र काळभोर, मधुराज  पवळे, रोहित काळभोर, मंगेश काळभोर, सागर सोनटक्के, नजीर खाटीक व प्रभागातील जेष्ठ नागरिक व व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest