पिंपरी-चिंचवड: वाकडच्या अनधिकृत 'रूफ टॉप'वर हातोडा - स्पाईस फॅक्टरी, अ‍ॅब्सोल्यूट बार्बेक्यू आणि पब्लिक हॉटेलवर केली कारवाई; आणखी १२ हॉटेलवर होणार कारवाई

शहरातील रूफ टॉप हॉटेल्स, पब, रेस्टॉरंटमधील अनधिकृत बांधकामे, फायर ऑडिट या अनुषंगाने पुन्हा तपासणी करून अनधिकृत असलेल्या हाॅटेलवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये वाकडमधील तीन रूफ टॉप हॉटेलवर महापालिकेकडून कारवाई केली आहे.

वाकडच्या अनधिकृत 'रूफ टॉप'वर हातोडा

विकास शिंदे:

शहरातील रूफ टॉप हॉटेल्स, पब, रेस्टॉरंटमधील अनधिकृत बांधकामे, फायर ऑडिट या अनुषंगाने पुन्हा तपासणी करून अनधिकृत असलेल्या हाॅटेलवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये वाकडमधील तीन रूफ टॉप हॉटेलवर महापालिकेकडून कारवाई केली आहे. (Wakad Roof Top Hotels)

पिंपरी-चिंचवड शहरातील ४३ पैकी ३१ रूफ टाॅप हाॅटेलवर यापूर्वी कारवाई झालेली आहे. काही हाॅटेलमालकांनी नियमितीकरणाचे प्रस्ताव दिले आहेत. आणखी १२ रूफ टॉप हॉटेलवर कारवाई बाकी आहे. तसेच शहरात पुन्हा एकदा रूफ टॉप हॉटेल, पब, रेस्टॉरंटचे सर्वेक्षण करून जे अनधिकृत असतील त्यांच्यावर कारवाई सुरू केली आहे. शहरात वाकड, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, चिंचवड, निगडी, स्पाईन रोड, भोसरी या भागांसह महापालिका हद्दीलगत असलेल्या परिसरात मोठ्या संख्येने रूफ टॉप हॉटेल्स उभारण्यात आली आहेत. इमारतीच्या टेरेसवर हॉटेल्स चालवले जातात. या हॉटेल्समध्ये ड्रिंक्स, जेवण अशा सर्व गोष्टी मिळतात. हॉटेल्समध्ये मोठ-मोठे किचन आहेत. मात्र, हे सर्व करताना एकाही हॉटेल मालकाने रूफ टॉप हॉटेल्ससाठीची परवानगी घेतलेली नव्हती. कोणाकडेही बांधकाम परवाना नाही, अग्निशमन विभागाचा ‘ना हरकत’ दाखला नाही.

दरम्यान, महापालिकेच्या 'ड' क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत वाकड येथील भुजबळ चौकातील मधुबन हॉटेल शेजारी रस्त्यालगत अनधिकृत रूफ टॉप स्पाईस फॅक्टरी, अब्सोल्यूट बार्बेक्यू आणि ९ व्या मजल्यावरील पब्लिक हॉटेलवर शनिवारी निष्कासनाची कारवाई करण्यात आली. सदर कारवाईत एकूण ९ हजार  चौरस  फूट क्षेत्रफळाचे अनधिकृत रूफ स्टॉप पाडण्यात आले आहेत. महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि अतिक्रमण उपायुक्त मनोज लोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली 'ड ' प्रभागाचे क्षेत्रीय अधिकारी अंकुश जाधव यांच्या अधिपत्याखाली बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील भागवानी, उप अभियंता विजय भोजने, कनिष्ठ अभियंता अमोल पडलवार, बिट निरीक्षक सुहास भगत, ओंकार ताटे, शेषराव अटकुरे, कनिष्ठ अभियंता 'ड' क्षेत्रीय अतिक्रमण पथकप्रमुख अमोल शिंदे, एम.एस.एफ.जवान, पोलीस उपनिरीक्षक अँथोनी यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest