पिंपरी-चिंचवड: विसर्जन मिरवणुकीनिमित्त वाहतूक मार्गात बदल, वाहन चालकांसाठी पर्यायी मार्गांची व्यवस्था

गणेश विसर्जन मिरवणुकीनिमित्त पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांमार्फत सोमवारी (दि. १६) भोसरी आणि वाकड परिसरातील तर मंगळवारी (दि. १७) चिंचवड, पिंपरी येथील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. याबाबत वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी माहिती दिली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 16 Sep 2024
  • 12:44 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

वाहतूक कोंडी होणार नाही याचे केले नियोजन

गणेश विसर्जन मिरवणुकीनिमित्त पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांमार्फत सोमवारी (दि. १६) भोसरी आणि वाकड परिसरातील तर मंगळवारी (दि. १७) चिंचवड, पिंपरी येथील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. याबाबत वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी माहिती दिली.

भोसरी आणि वाकड या भागातील बहुतांशी गणेश मंडळांच्या गणेशाचे अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी विसर्जन करण्याची परंपरा आहे. तर, चिंचवड, पिंपरीसह शहरात अनेक मंडळांच्या गणेशाचे अनंत चतुर्दशीदिवशी विसर्जन करण्यात येते. बहुतांशी मंडळांमार्फत विसर्जन मिरवणूक काढण्यात येते. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक विभागाच्या वतीने त्या-त्या परिसरातील गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

भोसरी वाहतूक विभाग
वाहतूक बदलाचा कालावधी - १६ सप्टेंबर रोजी दुपारी दोन ते रात्री अकरा वाजेपर्यंत.

- फुगेवाडी दापोडी ओव्हरब्रिज मार्गे शितळादेवी चौकाकडून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे पुण्याकडे जाणारा मार्ग बंद राहणार असून या मार्गावरील वाहतूक शितळादेवी चौकातून उजवीकडे वळून सांगवी मार्गे फुगेवाडी चौकातून हॅरिस ब्रिजच्या अंडरपासमधून बोपोडी मार्गे जातील.

- बाबर पेट्रोल पंप ते भोसरी ओव्हर ब्रिजखाली जाणार्‍या वाहनांना प्रवेश बंद असून या मार्गावरील वाहतूक भोसरी ओवर ब्रिज मार्गे पुढे धावडे वस्तीकडे जाऊन सद्गुरुनगर चौकातून यू टर्न मारून भोसरी ब्रिजखाली येऊन दिघी आळंदीकडे जातील.

वाकड वाहतूक विभाग
वाहतूक बदलाचा कालावधी - १६ सप्टेंबर रोजी दुपारी चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत.

- साठे चौक येथून दत्त मंदिर रोडवर जाण्यास मनाई असून ही वाहतूक कावेरीनगर किंवा काळा खडक चौक मार्गे जाईल.

- वाकड चौकाकडून दत्त मंदिर रोडवर जाण्यास मनाई असून ही वाहतूक वाकड चौकातून कस्पटे कॉर्नर मार्गे जाईल.

- उत्कर्ष चौकाकडून दत्त मंदिर रोड वाकड येथे येणार्‍या वाहनांना म्हातोबा चौक येथून प्रवेश बंद असून ही वाहने कस्पटे कॉर्नर मार्गे जातील.

पोलारिस हॉस्पिटल चौक दत्त मंदिर रोड तसेच सम्राट चौक दत्त मंदिर रोड येथील वाहतूक गरजेनुसार वळवली जाणार आहे.

चिंचवड वाहतूक विभाग
वाहतूक बदलाचा कालावधी - १७ सप्टेंबर रोजी दुपारी चार ते रात्री बारा वाजेपर्यंत.

- अहिंसा चौक ते चापेकर चौकाकडे जाणारा मार्ग बंद राहणार असून ही वाहतूक एसएएफ चौकातून खंडोबा माळ मार्गे वळविण्यात येणार आहे.

- दळवीनगर ब्रिजकडून चापेकर चौकाकडे जाणारा मार्ग बंद राहणार असून ही वाहने एसकेएफ चौकाकडून बिजलीनगर मार्गे जातील.

- वाल्हेकरवाडी टी जंक्शनकडून चापेकर चौकाकडे जाण्यास बंदी असून वाल्हेकरवाडी जुना जकात नाका डावीकडे वळून जैन शाळेपासून बिजलीनगर अथवा एसकेएफ-खंडोबा माळ मार्गे जाता येईल.

लिंकरोडवरून चापेकर चौकातील पीएमटी बस थांबा येथून चापेकर चौकात जाण्यास बंदी असून लिंकरोडने डावीकडे वळून काळेवाडी मार्गे पुढे जाता येईल.

- भोई आळी तसेच चिंचवड चौकी येथून चापेकर चौकात जाण्यास बंदी असून केशवनगर मार्गे पुढे जाता येईल.

- चिंतामणी चौक-वाल्हेकरवाडी रिव्हर व्ह्यू चौकाकडे जाण्यास वाहनांना बंदी असून चिंचवडेफार्म वाल्हेकरवाडी ब्रिज रावेत मार्गे पुढे जाता येईल.

अहिंसा चौक व रिव्हर व्ह्यू चौकाकडून चापेकर उड्डाणपुलावरून जाण्यास बंदी असून रिव्हर व्ह्यू चौकाकडून वाल्हेकरवाडी मार्गे अथवा अहिंसा चौक ते महावीर चौक अथवा एसकेएफ चौक मार्गे जाता येईल.

पिंपरी वाहतूक विभाग
वाहतूक बदलाचा कालावधी - १७ सप्टेंबर रोजी दुपारी चार ते रात्री बारा वाजेपर्यंत.

- पिंपरी चौकाकडून शगुन चौकाकडे जाणारा मार्ग बंद राहणार असून पिंपरी पुलावरून उजवीकडे वळून भाटनगर मार्गे, मोरवाडी मार्गे एम्पायर इस्टेटच्या मदर टेरेसा ब्रिजवरून काळेवाडी मार्गे जाता येईल.

- काळेवाडी पूल ते डिलक्स चौक, कराची चौकाकडे जाण्यास बंदी राहणार असून या मार्गावरील वाहतूक काळेवाडी पुलावरून उजवीकडे वळून जमतानी चौक व गेलार्ड चौकाकडून महात्मा फुले कॉलेज येथून उजव्या बाजूला वळून नवमहाराष्ट्र शाळा येथून पुढे जातील.

- पिंपरी चौकातून गोकुळ हॉटेलकडे जाण्यास बंदी असून ही वाहतूक पिंपरी सेवा रस्त्याने क्रोमा शोरूम समोरील रस्त्याने जाईल.

-  सर्जा हॉटेल ते पवनेश्वर मंदिर या मार्गावरील वाहतूक बंद राहणार असून ही वाहतूक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पिंपरी येथून वळवण्यात आली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest