आकुर्डीत गणरायाला भावपूर्ण निरोप

गणपती विसर्जन मिरवणूक निमित्त सोमवारी, मंगळवारी संध्याकाळी मोठी भाविकांची गर्दी होइल. वाहतुकीस अडथळा होऊ नये व सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि व्यापाऱ्यांनाही या मिरवणुकीत सहभागी होता यावे यासाठी सोमवारी आणि मंगळवारी (दि. १६ व १७) सायंकाळी सहानंतर व्यापारी उस्फूर्तपणे दुकाने बंद ठेवणार आहेत, अशी माहिती पिंपरी मर्चंट फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवानी यांनी दिली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 16 Sep 2024
  • 02:56 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

तरुणाईची पाऊले थरकली डीजेच्या तालावर, सात दिवसांच्या गणपतीचे विसर्जन

गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या’ च्या जयघोषात आकुर्डीमधील दत्तवाडी या परिसरात सातव्या दिवशी लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. पारंपरिक पद्धतीने ढोल-ताशांच्या गजरात आणि डीजेच्या जल्लोषांत बाप्पांचे विसर्जन झाले.

गणपती विसर्जन मिरवणूक निमित्त सोमवारी, मंगळवारी संध्याकाळी मोठी भाविकांची गर्दी होइल. वाहतुकीस अडथळा होऊ नये व सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि व्यापाऱ्यांनाही या मिरवणुकीत सहभागी होता यावे यासाठी सोमवारी आणि मंगळवारी (दि. १६ व १७) सायंकाळी सहानंतर व्यापारी उस्फूर्तपणे दुकाने बंद ठेवणार आहेत, अशी माहिती पिंपरी मर्चंट फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवानी यांनी दिली आहे.

गणेशोत्सव आनंदात आणि उत्साहात साजरा करताना नागरिकांनी पर्यावरणाचीही काळजी घ्यावी, असे आवाहनही आयुक्त सिंह यांनी केले. सांगवी येथे गणेश विसर्जन होत असून पोलीस प्रशासन आणि महापालिकेच्या संयुक्त पथकाने सांगवीतील सर्व विसर्जन घाटांवर प्रत्यक्ष पाहणी करून स्वच्छता आणि सुरक्षेचा आढावा घेतला होता. या पथकात सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल यांचा समावेश होता. सांगवी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट, वेताळ महाराज घाट, दत्त मंदिर घाट आदी घाटांची पाहणी या पथकाने केली होती.

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या महापालिकेच्या आवाहनाला नागरिक उस्फूर्त प्रतिसाद देत आहेत. सांगवी येथे आज गणेश विसर्जन होत असून महापालिकेच्या वतीने निर्माल्य संकलनासाठी निर्माल्य कुंडांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी गणेश विसर्जन करण्यासाठी येणारे नागरिक सर्व निर्माल्य कुंडातच टाकत आहेत. तसेच या विसर्जन घाटांवर ‘गणेश विसर्जन फिरती पथक’ वाहन मूर्ती संकलित करत आहे. या ठिकाणी गणेश विसर्जनासाठी येणारे नागरिक उस्फूर्तपणे मूर्तिदान करत आहेत. विसर्जनाच्या ठिकाणी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबतचे सूचना फलक महापालिकेच्या वतीने लावण्यात आले असून नागरिक देखील पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर देत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात गणेश मंडळांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन नवव्या व दहाव्या दिवशी होते.

गणेश मंडळांकडील गणेश मूर्तींचे पिंपरी, चिंचवड व भोसरी येथील विसर्जन घाटांवर विसर्जन केले जाते. या ठिकाणी गणेश विसर्जनासाठी येणाऱ्या गणेश मंडळ व गणेश भक्तांचे दरवर्षीप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे. १६ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६ पासून भोसरीतील गणेश मंडळ व गणेश भक्तांचे स्वागत भोसरी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ महापालिकेच्या स्वागत कक्षात करण्यात येणार आहे. १७ सप्टेंबर रोजी गणेश मंडळ आणि गणेश भक्तांचे स्वागत दुपारी ३ वाजेपासून पिंपरी येथील कराची चौक तसेच चिंचवड येथील चाफेकर चौकातील महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या स्वागत कक्षात करण्यात येणार आहे. यंदाच्या गणेशोत्सवाची सांगता पर्यावरणाचे रक्षण करत सुरक्षित व उत्साहाच्या वातावरणात करण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध सेवा सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. शहरात विविध ठिकणी ८५ गणेश विसर्जन घाट आणि मूर्ती संकलन केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महापालिकेने क्षेत्रीय कार्यालयनिहाय ४० फूट बाय ३० फूट आकाराची आणि ५ फूट खोल अशी एकूण १५ भव्य विघटन केंद्रांची स्थापना देखील केली आहे. या विघटन केंद्रांवर प्रथमच गणेश मूर्तींचे रासायनिक प्रक्रियेद्वारे शास्त्रोक्त पद्धतीने विघटन करण्यात येणार आहे. या १५ विघटन केंद्रांच्या ठिकाणी जीवरक्षकांची नेमणूकही करण्यात आली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest