पिंपरी-चिंचवड: ईद-ए-मिलाद निमित्त वाहतुकीत बदल

हजरत मोहम्मद पैगंबर जयंती (ईद-ए-मिलाद) निमित्त पिंपरी येथे गुरुवारी (दि. १९) मिरवणूक काढली जाणार आहे. तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक परिसरात प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 16 Sep 2024
  • 12:35 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

हजरत मोहम्मद पैगंबर जयंती (ईद-ए-मिलाद) निमित्त पिंपरी येथे गुरुवारी (दि. १९) मिरवणूक काढली जाणार आहे. तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक परिसरात प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी शहराच्या विविध भागातून मुस्लीम बांधव एकत्र येणार आहेत. कार्यक्रमासाठी मोठी गर्दी होणार असल्याने पिंपरी परिसरातील वाहतूक गुरुवारी दुपारी दोन ते मध्यरात्री बारा वाजेपर्यंत वळविण्यात आली आहे.

याबाबतचे आदेश पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी दिले आहेत. महावीर चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी हा मार्ग बंद असून या मार्गावरील वाहने डी मार्ट इन ग्रेड सेपरेटर मार्गे जातील. नाशिक फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी हा मार्ग बंद असून या मार्गावरील वाहने डेअरी फार्म ग्रेड सेपरेटर इन व एचपी पेट्रोल पंप खराळवाडी ग्रेड सेपरेटर इन मार्गे जातील. इंदिरा गांधी पूल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी या मार्गावरील वाहने मोरवाडी चौक मार्गे जातील.

नेहरुनगर चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी या मार्गावरील वाहने कॉर्नर बस स्टॉप येथून मासुळकर कॉलनी मार्गे जातील. जय मल्हार खानावळ सम्राट चौक ते मोरवाडी चौक मार्गावरील वाहने सम्राट चौक ते ऑटो क्लस्टर मार्गे मदर तेरेसा ब्रिज, बसवेश्वर चौक मार्गे तसेच जुना मोरवाडी कोर्ट तसेच केएसबी चौक मार्गे जातील.

सायन्स पार्क ते मोरवाडी चौक मार्ग बंद राहणार असून या मार्गावरील वाहने ऑटो क्लस्टर ते मदर तेरेसा ब्रिज तसेच बसवेश्वर चौक मार्गे जातील. क्रोमा शोरूम ते गोकुळ हॉटेल या मार्गावरील वाहने क्रोमा शोरूम पिंपरी पुलावरून भाटनगर मार्गे जातील. पिंपरी चौक ते स्व. इंदिरा गांधी पूल या मार्गावरील वाहने मोरवाडी चौक मार्गे पिंपरी पुलावरून भाटनगर येथून जातील.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest