संग्रहित छायाचित्र
निगडी मधील अमरधाम स्मशानभूमी जवळ असलेल्या लाकडाच्या वखारीला आग लागली. ही घटना शुक्रवारी (१९ एप्रिल) सायंकाळी पावणे पाच वाजता घडली.
अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, निगडी मधील अमरधाम स्मशानभूमी जवळ लाकडाची वखार आहे. त्या वखारीला शुक्रवारी सायंकाळी पावणे पाच वाजताच्या सुमारास आग लागली. याबाबत माहिती मिळताच मुख्य अग्निशमन केंद्र पिंपरी, चिखली उपकेंद्र, प्राधिकरण उपकेंद्र, थेरगाव उपकेंद्र येथील बंब रवाना करण्यात आले.
जवानांनी काही वेळेत आगीवर नियंत्रण मिळवले. आगीमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. अंत्यविधीसाठी लागणारा लाकूड फाटा असलेल्या वखारीला आग लागली होती. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.