संग्रहित छायाचित्र
एका मद्यपी वाहनचालकाने त्याच्या ताब्यातील ऑडी कार भरधाव चालवून बॅरिकेडला धडक दिली. यामध्ये गाडीचे चाक निघून ते एका रिक्षावर आदळले. यामध्ये रिक्षातील चार जण गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी (दि. १४) मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास औंध-रावेत बीआरटी रोड, जगताप डेअरी ब्रिज जवळ, वाकड येथे घडली.
विराज नरेंद्र अहिरे (वय २१, रा. पिंपळे सौदागर) असे मद्यपी कार चालकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार गणेश जाधव यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विराज याने त्याच्या ताब्यातील ऑडी कार (एमएच १४/डीझेड ८११८) ही निष्काळजीपणाने बेदरकारपणे चालवली. यावेळी त्याने मद्यप्राशन केले होते. भरधाव कार चालवून रस्त्याच्या बॅरीकेडला कारने धडक दिली. अपघातात कारचे चाक निघून ते एका रिक्षावर आदळले. यामध्ये रिक्षातील चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तसेच बॅरिगेड, लाईट खांब व इतर सरकारी मालमत्तेचे नुकसान झाले असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.