यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (YCM) कचरा कुंडीत एक स्त्री जातीचे मृत अर्भक (Female stillborn) सापडले आहे. हा प्रकार आज (शनिवारी) सकाळी अकरा वाजताच्या सुमारास उघडकीस आला आहे. हे अर्भक कोणी टाकले याचा सीसीटीव्हीच्या (Pimpri chinchwad) माध्यमातून पोलीस शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वायसीएम रुग्णालयाच्या आउटगेट येथे दोन कचरा कुंड्या आहेत. आज सकाळी अकराच्या सुमारास येथील कर्मचारी कचरा उचलत होते. यावेळी एका कचरा कुंडीत अर्भक दिसून आले. हे स्त्री जातीचे अर्भक असून अंदाजे सात महिन्यांचे असेल.
कर्मचारी कचरा उचलताना अर्भक सापडले त्यावेळी ते मृत झालेले होते. शुक्रवारी रात्री एका महिला रुग्णालयाच्या मागच्या गेटने परिसारात आली आणि नंतर कचरा कुंडीत हे बाळ टाकले असावे, असा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे तपासत आहेत. मात्र, अवघ्या सात महिन्यांचे अर्भक कचरा कुंडीत फेकल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.