सीएनजी गॅस शवदाहिनीत पुन्हा बिघाड
जुनी सांगवी येथील सीएनजी गॅस शवदाहिनीच्या इलेक्ट्रीक कंट्रोल पॅनेलची दुरुस्ती करण्यासाठी चार दिवस शवदाहिनी बंद ठेवण्यात आली. मात्र, पॅनेल दुरुस्तीनंतर दुसऱ्याच दिवशी गॅस शवदाहिनीत शव अंत्यसंस्कारासाठी ठेवण्यात आले. पण, गॅस शवदाहिनीच्या भट्टीचा दरवाजा आणि बाजूने प्रचंड धुराचे लोट पसरले होते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर त्या धुराचा परिणाम होऊ लागला. त्यानंतर शवदाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी बंद करण्यात आली. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी नागरिकांची गैरसोय होऊ लागली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने जुनी सांगवी येथे सीएनजी गॅस शवदाहिनी उभारली आहे. त्या शवदाहिनीच्या इलेक्ट्रिक कंट्रोल पॅनलमध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे सीएनजी शवदाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी चार दिवस बंद ठेवण्यात आली होती. सीएनजी गॅस शवदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यासाठी सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव, दापोडी, विविध ठिकाणचे सर्वच नागरिक येत असतात. याची नोंद घ्यावी. सीएनजी गॅस शवदाहिनीच्या इलेक्ट्रिकल कंट्रोल पॅनलमध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे सीएनजी गॅस शवदाहिनी ही दुरुस्त करण्यासाठी मे.एन.वाय.सी. एंटरप्रायजेस यांना चालन, देखभाल व दुरुस्तीचे कंत्राट दिले होते. हे काम पूर्ण होण्यास चार दिवस लागणार असल्याने सीएनजी गॅस शवदाहिनी बंद ठेवली होती.
विद्युत प्रशासनाने शवदाहिनीच्या इलेक्ट्रीक कंट्रोल पॅनलमध्ये ठेकेदाराकडून दुरुस्ती करून शवदाहिनी सुरू देखील झाली. परंतु, शवदाहिनी सुरू झाल्यानंतर त्या रात्री अंत्यविधीसाठी शव (डेडबाॅडी) घेतली. सीएनजी दाहिनीत अंत्यविधी करण्यास शव (डेडबाॅडी) ठेवण्यात आली. मात्र, शवदाहिनीच्या भट्टीचा दरवाजा व बाजूने प्रचंड धुराचे लोट पसरले होते. अशी तक्रार तेथील नागरिकांनी केली. धूर आतच पसरत असल्याने अंत्यविधीला आलेल्या नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला होता. त्यानंतर सीएनजी शवदाहिनीची पाहणी करून तत्काळ दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली. शवदाहिनी या भट्टीचे दरवाजे खोलून काम सुरू केले. धूर कोठून येतोय, त्याच्या दुरुस्तीला सुरुवात झाली. त्यामुळे पुन्हा तीन दिवस शवदाहिनी बंद करण्यात आली. दरम्यान, सीएनजी शवदाहिनीच्या पॅनेल दुरुस्तीसाठी चार आणि पुन्हा तीन दिवस बंद ठेवल्याने अंत्यविधी करण्यास नागरिकांची गैरसोय होऊ लागली. सीएनजी शवदाहिनी तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. याबाबत सीएनजी गॅस शवदाहिनी दुरुस्तीचे काम सुरू आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून तत्काळ दुरुस्ती करून गॅस दाहिनी चालू करण्याचे नियोजन आहे, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
सांगवीतील सीएनजी शवदाहिनी दुरुस्तीसाठी पहिल्यांदा चार दिवस बंद होती. मात्र, दुरुस्ती केल्यानंतर देखील शवदाहिनीच्या भट्टी दरवाजा व बाजूने प्रचंड धुराचे लोट येत होते. त्यामुळे अंत्यविधीला आलेल्या नागरिकांच्या आरोग्यावर धोका निर्माण झाला. त्यांची तक्रार विद्युत विभागाकडे करून अधिकाऱ्यांसमक्ष पाहणी करून तक्रार करत पुन्हा दुरुस्तीस सुरुवात झाली. त्यानंतर तीन दिवस शवदाहिनी बंद करण्यात आली. शवदाहिनी चालू करण्यास पाठपुरावा सुरू आहे.
-राजू सावळे, उपाध्यक्ष, शहर मनसे, पिंपरी-चिंचवड
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.