Pimpri Chinchwad: मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ आज 'बंद' ची हाक

पिंपरी-चिंचवड: राज्यातील मराठा समाजाच्या विविध मागण्यांची अंमलबजावणी करावी, यासाठी आरक्षणाचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील उपोषणाचा सुरू आहे. त्यास पाठिंबा देण्यासाठी

संग्रहित छायाचित्र

पिंपरी-चिंचवड आणि मावळ परिसरात दुचाकी रॅली

पिंपरी-चिंचवड: राज्यातील मराठा समाजाच्या विविध मागण्यांची अंमलबजावणी करावी, यासाठी आरक्षणाचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील उपोषणाचा सुरू आहे. त्यास पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाच्या वतीने बुधवारी (१४ फेब्रुवारी) शहर बंदची हाक देण्यात आली आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड आणि मावळ (Maval) परिसरात दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे. (Pimpri Chinchwad News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  (Eknath Shinde) यांनी मराठा समाजाच्या सर्व मागन्या मान्य करून आरक्षणाचा अध्यादेश काढला. त्यात सगेसोयरे यांना कुणबी दाखले देण्याचे मान्य केले. त्याचे कायद्यात रूपांतर व्हावे तसेच आरक्षण आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत. सरकारने मराठा समाजास दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी. राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे, यासाठी मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण करत आहेत. त्यांना समर्थन  बंदची हाक देण्यात आली आहे. मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच, बुधवारी पिंपरी-चिंचवड शहर बंद ठेवण्यात येणार आहेत. (Maratha Reservation News)

पिंपरी-चिंचवड शहर व मावळ तालुक्याच्या वतीने भव्य दुचाकी व चार चाकी रॅली काढण्यात येणार आहे. रॅलीची सुरुवात बुधवारी सकाळी नऊ वाजता डांगे चौक थेरगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून होईल. तेथून पुढे काळेवाडी फाटा, जगताप डेअरी, रहाटणी, पिंपरीगाव मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी व महात्मा जोतिराव फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करून रॅली चिंचवड स्टेशन, आकुर्डी, भक्ती-शक्ती समूह शिल्प निगडी येथे जाणार आहे. त्यानंतर रॅली तळेगाव मार्गे वडगावकडे रवाना होईल. छत्रपती संभाजी महाराज चौक वडगाव मावळ येथे रॅलीचा समारोप होणार आहे. रॅलीचे नियोजन सतीश काळे,सचिन बारणे,प्रकाश जाधव,भाऊ ढोरे,वैभव जाधव,नरेंद्र मुर्हे,अमोल ढोरे,नकुल भोईर,रावसाहेब गंगाधरे,विशाल मुर्हे,गणेश देवराम,संतोष शिंदे,सागर चिंचवडे,अरुण पवार,लहू लांडगे, शिवाजी पाडुळे,पोपट काळभोर, मारुती भापकर,सुनीता शिंदे,सचिन काळभोर यांनी केले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest