शाळेच्या बसमध्ये कोंबले तब्बल ९२ विद्यार्थी
पिंपरी चिंचवडमध्ये स्कूल बस चालकांचा अजब प्रकार समोर आला आहे. मोशी येथील एक्सिलंस शाळेच्या स्कूल बसमध्ये ४२ विद्यार्थी वाहतुकीची क्षमता असताना तब्बल ९२ विद्यार्थी बसविण्यात आले आहे. या प्रकरणी पिंपरी चिंचवड आरटीओने बस चालकाला १३ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
मोशी येथील एक्सिलंस शाळेच्या स्कूल बसमध्ये तब्बल ९२ विद्यार्थी बसविण्यात आले. बसमध्ये विद्यार्थ्यांना श्वासही घेता येणार नाही, अशा पद्धतीने हे विद्यार्थी कोंबाण्यात आले होते. दरम्यान, पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) अधिकाऱ्यांनी या बसला पकडून त्यावर कारवाई केली आहे.
संबंधित स्कूलच्या मुख्याध्यापकांना घटनास्थळी बोलावून विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बसची व्यवस्था करण्यात आली. मोशी भागात नुकतीच ही कारवाई करण्यात आली आहे. बस चालकाला १३ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.