अतिरिक्त आयुक्तांनी केली संत तुकाराम महाराज पादुकांची महापूजा
आकुर्डी येथील श्री विठ्ठल रुक्मिृणी मंदिरात शनिवारी (दि.२९) जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी मुक्कामी होते. रविवारी पहाटे ३.३० वाजता महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील आणि विजय खोराटे यांनी सहपत्नीक संत तुकाराम महाराज पादुकांचे पूजन व महाआरती करण्यात आली.
यावेळी उपआयुक्त निलेश बधाने, क्षेत्रीय अधिकारी सुचेता पानसरे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश महिवाल, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचे गोपाळ कुटे, गुलाब कुटे व देहू संस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते. आकुर्डी येथील मुक्कामास असलेल्या संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांची पहाटे ३.३० वाजता अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील ,विजयकुमार खोराटे यांच्या हस्ते सपत्नीक पूजा व अभिषेक करण्यात आला. यानंतर पालखी सोहळा आकुर्डीतील खंडोबामाळ चौक मार्गे मोरवाडी चौक, खराळवाडी येथील विठ्ठल मंदिराकडे मार्गस्थ झाली.
सकाळी साडेसहा ते सातला पालखी सोहळा खराळवाडी येथील विठ्ठल मंदिरात विसावला. सकाळी नऊच्या सुमारास पुढे मार्गस्थ झालेला पालखी सोहळा दुपारच्या मुक्कामासाठी दापोडी येथे थांबला. दुपारी दोननंतर हा पालखी सोहळा पुण्याच्या हद्दीत पोहोचला. दरम्यान, संत तुकाराम महाराजांची पालखी आकुर्डीत मुक्कामी असते. दुसऱ्या दिवशी पहाटेची पादुका महापुजा महापालिका आयुक्त हे सहपत्नीक करत असतात. मात्र, आयुक्त सिंह ११ जूनपासून सुट्टीवर होते. त्यांची सुट्टी ही शुक्रवारी (दि.२८) पर्यंतच होती.
तसेच शनिवार व रविवारी महापालिकेला सुट्टी आहे. मात्र, आयुक्त शेखर सिंह हे महापूजेला गैरहजर राहिले. त्यामुळे संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पुजन दोन्ही अतिरिक्त आयुक्तांना करावे लागले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.