Pimpri-Chinchwad: दिव्यांग कर्मचाऱ्यांचे जनजागृतीपर पथनाट्य

जागतिक सांकेतिक भाषा आणि जागतिक कर्णबधिर दिनानिमित्त महानगरपालिका दिव्यांग भवन फाऊंडेशनतर्फे दिव्यांग कर्मचाऱ्यांनी जनजागृतीपर पथनाट्य सादर केले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 9 Oct 2024
  • 01:14 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

दिव्यांग कर्मचाऱ्यांचे जनजागृतीपर पथनाट्य

जागतिक कर्णबधिर दिनानिमित्त महापालिकेच्या दिव्यांग भवन फाऊंडेशनचा उपक्रम

जागतिक सांकेतिक भाषा आणि जागतिक कर्णबधिर दिनानिमित्त महानगरपालिका दिव्यांग भवन फाऊंडेशनतर्फे दिव्यांग कर्मचाऱ्यांनी जनजागृतीपर पथनाट्य सादर केले. त्यानंतर महानगरपालिका भवनापासून दिव्यांग भवन फाऊंडेशनपर्यंत जनजागृती फेरी काढण्यात आली. या फेरीची सुरुवात समाजविकास विभागाचे साहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, श्रीनिवास दांगट यांनी झेंडा दाखवून केली. याप्रसंगी साहाय्यक आयुक्त तानाजी नरळे यांनी सांकेतिक भाषा शिकणे ही काळाची गरज असून सर्वांनी ती भाषा आत्मसात करावी, असे मत व्यक्त केले. जनजागृती फेरीत चिंचवड कर्णबधिर विद्यालय निगडी, सी. आर. रंगनाथन महाविद्यालय विश्रांतवाडी, पिंपरी-चिंचवड कर्णबधिर असोसिएशन, फीन संघटना महाराष्ट्र यांसारख्या अनेक संस्था आणि दिव्यांग भवनचे कर्मचारी 'शब्द जेव्हा मुखातून न येई, सांकेतिक संवादच आधार होई', 'हातात हात द्या विशेष मुलांना साथ द्या' असे नारे देत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

चिंचवड कर्णबधिर विद्यालय, निगडीच्या विद्यार्थ्यांनी सांकेतिक भाषेत ईशस्तवन सादर करून कार्यक्रमाचा उत्साह आणखी वाढला. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. स्वाती सदाकळे यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले आणि कर्णबधिर व्यक्तींच्या हक्कांवर, सांकेतिक भाषेच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. याप्रसंगी अंबु गिरी, पांडुरंग गर्जे, परशुराम बसवा यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. दिव्यांग भवन फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख यांनी मनोगतात दिव्यांग भवन येथे सांकेतिक भाषेचे वर्ग लवकरच सुरू करण्यात येतील असे आश्वासन दिले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest