काळेवाडीत निवासी परिसरातील कारखान्याला भीषण आग
पिंपरी चिंचवड: शहरातील काळेवाडी (Kalewadi Fire) येथे एका निवासी परिसरातील कारखान्याला सकाळी दहाच्या सुमारास भीषण आग लागली. सिलिंडरच्या स्फोटामुळे नंतर ही आग भडकत जाऊन आसपासचे सहा छोटे कारखाने आगीत भस्मसात झाले आहेत. (Pimpri Chinchwad Fire)
सकाळी दहा वाजता दरम्यान काळेवाडी येथील कपड्याच्या कारखान्याला आणि पेपर प्लेट बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग लागली आहे. ज्या ठिकाणी आग लागली त्या गोडाऊनमध्ये गॅस सिलेंडरचे स्फोट देखील होत आहेत. तसेच आगीच काळ धूर आकाशात सर्वत्र पसरले आहेत. आगीच्या काळ्या धुरामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलं आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेचा अग्निशमन दल आग आटोक्यात आणण्यासाठी घटनास्थळी दाखल झालं आहे. ज्या कारखान्याला आग लागली आहे. तो कारखाना अधिकृत कारखाना आहे का ? किंवा त्या कारखान्याला पिंपरी चिंचवड महापालिकेने परवानगी दिली होती का असा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.