पिंपरी-चिंचवड: शाहूनगर येथील सदनिकेत आग लागून घरगुती साहित्य खाक

पिंपरीतील शाहूनगर येथील एका सदनिकेत दुपारी एक वाजता आग लागून घरातील सगळे साहित्य जळून खाक झाले. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. महापालिकेच्या अग्नीशमन विभागाकडून तात्काळ पाचारण केल्याने ही आग आटोक्यात आली.

Pimpri Chinchwad Fire

शाहूनगर येथील सदनिकेत आग लागून घरगुती साहित्य खाक

सुदैवाने जीवितहानी नाही, गॅस सिलेंडर बाहेर काढल्याने पुढील अनर्थ टळला

विकास शिंदे

पिंपरीतील शाहूनगर येथील एका सदनिकेत दुपारी एक वाजता आग लागून घरातील सगळे साहित्य जळून खाक झाले. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. महापालिकेच्या अग्नीशमन विभागाकडून तात्काळ पाचारण केल्याने ही आग आटोक्यात आली.

शाहूनगर येथील एका सदनिकेत दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. त्या सदनिकेतील सगळे घरगूती साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग लागल्याची माहिती मिळताच चिखली उप अग्नीशमन पथक, पिंपरी अग्निशमन पथक, प्राधिकरण अग्निशमन पथक, तळवडे अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले. आग लागल्याचे समजताच आर्यनम सोसायटीतील रहिवासी खाली आले.

इमारतीमधील इतरांच्या घरात आलेल्या धुरास दारे, खिडक्या उघडून वाट करून दिली. तसेच ज्या घराला आग लागली होती त्यातून दोन गॅस सिलेंडर बाहेर काढल्याने पुढील अनर्थ टळला.

आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र शाॅर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. ज्या घरात आगीची घटना घडली त्यामध्ये एक ज्येष्ठ महिला राहत होती. मात्र आग लागल्याचे समजताच त्यांनी इतरांना सावध करीत इमारतीबाहेर आल्या.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest