पिंपरी-चिंचवड: शहरातील ९ सिग्नल बंद; महापालिका अनभिज्ञ

पिंपरी-चिंचवड शहरातील पहिल्याच पावसात मंगळवारी (४ जून ) विविध ठिकाणांचे ९ सिग्नल ऐन वाहतुकीच्या 'रश अवर्स' मध्ये बंद पडले. पर्यायाने वाहतूक पोलिसांची मोठी दमछक झाली. मात्र, शहरातील एकाच वेळी एवढे सिग्नल पडूनही महापालिका प्रशासन त्याबाबत अनभिज्ञ होते.

संग्रहित छायाचित्र

वीज पुरवठा खंडित झाल्याने बंद पडल्याचा दावा, पोलिसांवर आली हाताने वाहतूक नियंत्रण करण्याची वेळ

पंकज खोले 

पिंपरी-चिंचवड शहरातील पहिल्याच पावसात मंगळवारी (४ जून ) विविध ठिकाणांचे ९ सिग्नल ऐन वाहतुकीच्या 'रश अवर्स' मध्ये बंद पडले. पर्यायाने वाहतूक पोलिसांची मोठी दमछक झाली. मात्र, शहरातील एकाच वेळी एवढे सिग्नल पडूनही महापालिका प्रशासन त्याबाबत अनभिज्ञ होते. कदाचित, वीजपुरवठा खंडित झाल्याने ते बंद पडले असतील, असा दावा महापालिकेच्या विद्युत विभागाने केला आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध ठिकाणी जवळपास चालू स्थितीतील ७१ सिग्नल आहेत. यातील बहुतांश सिग्नल मुख्य चौकात असल्याने वाहतूक नियंत्रण व्यवस्थित होते. मात्र, मंगळवारी पिंपरी-चिंचवड शहर परिसरासह उपनगरात कोसळलेल्या पावसामुळे यापैकी सिग्नल यंत्रणा बंद पडली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली होती. निवडणुकीच्या बंदोबस्तात तैनात असलेल्या वाहतूक पोलिसांना धावपळ करावी लागली. सिग्नल सुरू होत नसल्याने अखेर हाताने वाहतूक नियंत्रण करण्याची वेळ पोलिसांवर आली. रात्री उशिरापर्यंत ९ पैकी अनेक सिग्नल सुरू झाले नव्हते. (PCMC Traffic News)

दरम्यान, शहरातील सिग्नल यंत्रणा महापालिकेच्या विद्युत विभागात मोडते. त्या यंत्रणेची स्वतंत्र देखभाल दुरुस्ती करण्याची गरजेची नसते, असे महापालिकेने स्पष्ट केले. ते कायम सुरू असल्याने कदाचित वीज पुरवठा खंडित झाल्याने अथवा ट्रीप झाल्याने सिग्नल बंद पडले असतील. त्याबाबत कोणतीही माहिती महापालिका प्रशासनाला कळवली नव्हती. दुसरीकडे, वाहतूक पोलिसांच्या म्हणण्यानुसार सिंग्नल यंत्रणा बंद पडल्यास त्याची माहिती महापालिका कळवण्यात येते. त्यानुसार संबंधित यंत्रणेची दुरुस्ती होते.

सिग्नल यंत्रणा २४ तास सुरू असते. कदाचित वीज पुरवठा खंडित झाल्याने ते बंद पडली असतील. त्या बाबत तक्रार ही कुठली आली नाही . तरी पावसामुळे तांत्रिक बिघाड झाला असावा.
- बाबासाहेब गलबले, सह-शहर अभियंता, विद्युत विभाग

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest