पायी जाणाऱ्या नागरिकाचा टेम्पोच्या धडकेत मृत्यू
पिंपरी : पायी जाणाऱ्या नागरिकाला एका आयशर टेम्पोने जोरदार धडक दिली त्यामध्ये नागरिकाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात शनिवारी (४ नोव्हेंबर) कुदळवाडी येथे कुदळवाडी चौक येथे घडली आहे.
याप्रकरणी लखन धनराज पाडुळे (वय २३ रा,रहाटणी) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून आयशर टेम्पो चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील धनराज पाडुळे हे पायी जात असताना आयशर टेम्पो भरधाव वेगाने आला व त्यांना धडक दिली. यामध्ये धनराज पाडुळे गंभीर जखमी झाले व यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत कोणतीही माहिती न देता आरोपी हा तेथून पळून गेला. यावरून चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.