संग्रहित छायाचित्र
पिंपरी : रस्त्याने पायी जाणाऱ्या व्यक्तीला भरधाव वाहनाने धडक (Accident News) दिली. त्यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (२५ ऑक्टोबर) रात्री पावणे नऊ वाजता खेड तालुक्यातील कोरेगाव फाटा (Koregaon Phata) ते कोरेगाव मार्गावर घडली.
काळूराम गजानन मेंगळे (वय ४०, रा. कोरेगाव, ता. खेड) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार अनिल शेळके यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस (Mahalunge MIDC Police) ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळूराम मेंगळे हे कोरेगाव फाटा येथून कोरेगाव येथे पायी चालत जात असताना त्यांना भरधाव आलेल्या एका वाहनाने धडक दिली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर वाहन चालक घटनास्थळी न थांबता पळून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.