पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या इमारतीवर डेंग्यूचे आगार?

दिव्याखालीच अंधार, सामान्य प्रशासनातील तीन कर्मचाऱ्यांना डेंग्यू, शहरात डेंग्यूचा वाढला प्रादुर्भाव, २९ रुग्णांवर उपचार सुरू

PCMC News

पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या इमारतीवर डेंग्यूचे आगार?

दिव्याखालीच अंधार, सामान्य प्रशासनातील तीन कर्मचाऱ्यांना डेंग्यू, शहरात डेंग्यूचा वाढला प्रादुर्भाव, २९ रुग्णांवर उपचार सुरू

महापालिकेकडून 'डेंग्युमुक्त पिंपरी-चिंचवड' ही मोहीम शहरात सर्वत्र राबवण्यात येत आहे. त्याशिवाय डासोत्पत्ती ठिकाण नष्ट केले जात आहेत. माञ, महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून शेवाळ तयार झाले आहे. त्या ठिकाणीच डेंग्यू सदृश्य अळ्या आढळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात डासोत्पत्ती ठिकाणे नष्ट करताना महापालिकेच्या इमारतीकडे दुल॔क्ष झाले आहे. त्यातच सामान्य प्रशासनातील तीन कर्मचाऱ्यांना डेंग्यू झाला असून अन्य कर्मचाऱ्यांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तिसऱ्या मजल्यावर सौर ऊर्जा पॅनल बसवले आहेत. या पॅनलखाली पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचून राहिले आहे. मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात स्वच्छ पाणी साचून राहिल्याने डासोत्पत्ती ठिकाण तयार झाले आहे. संपूर्ण शहरात महापालिकेकडून प्रत्येक प्रभागात 'डेंग्युमुक्त पिंपरी-चिंचवड' ही मोहीम वैद्यकीय व आरोग्य विभागाने हाती घेतली आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांकडून आपले घर व परिसर स्वच्छ करून जिथे पाणी साचते. त्या ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या तयार होवू नये म्हणून स्वच्छता करणे आवश्यक आहे. मात्र, महापालिकेच्या तिसऱ्या मजल्यावर सौर ऊर्जा पॅनलखाली पावसाचे पाणी साचून राहिले आहे. या पाण्याने पॅनलखाली शेवाळ तयार झाले आहे. त्यातच मागील चार दिवसासांपासून पावसाची संततधार सुरुवात झाली आहे. त्यामुळे आणखी पाणी साचले झाले आहे.

दरम्यान, महापालिकेच्या इमारतीवर पाणी साचल्याने डासोत्पत्ती आगार तयार झाले आहे. त्यामुळेच पाण्यात डेंग्यू अळ्या असण्याची दाट शक्यता आहे. शहरभर मोहीम करताना महापालिकेकडून आपल्याच इमारतीवर डासोत्पत्ती नष्ट करण्याकडे दुल॔क्ष केल्याचे दिसून आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest