अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू; एकजण गंभीर
पिंपरी : अज्ञात वाहनाने (Pimpri Chinchwad News) दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात (accident) दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. तर दुचाकीवरील सहप्रवासी गंभीर जखमी झाला. हा अपघात बुधवारी (२५ ऑक्टोबर) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास चाकण-शिक्रापूर (Chakan-Shikrapur) रोडवर मोहितेवाडी येथे घडला.
रमेश हुलगप्पा मचाले (वय ३७, रा. आळंदी) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वराचे नाव आहे. शशिकांत राणा (रा. तळवडे) असे जखमी सह्प्रवाशाचे नाव आहे. याप्रकरणी रमेश यांचा भाऊ बाबू हुलगप्पा मचाले (वय ३८) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास फिर्यादी यांचा भाऊ रमेश आणि त्यांचा मित्र शशिकांत राणा हे दोघेजण दुचाकीवरून चाकण - शिक्रापूर रोडने जात होते. मोहितेवाडी येथे आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरात धडक दिली. त्यामध्ये दुचाकीवरील दोघेजण रस्त्यावर पडले. त्यात रमेश यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या दुचाकीवरील शशिकांत राणा हे गंभीर जखमी झाले आहेत. चाकण पोलीस तपास करीत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.