मुसळधार पावसामुळे फसला दलदलीत, अग्निशमन दलाकडून व्यक्तीची सुटका
पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. अशातच एक व्यक्ती दलदलीत फसल्याची घटना घडली आहे. निगडी परिसरातील मूक-बधिर शाळेच्या पाठीमागे सकाळी साडेसातच्या सुमारास एक व्यक्ती दलदलीत फसली. मात्र, या व्यक्तीची अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
निळकंठ पाटील असे दलदलीत फसलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निळकंठ हे त्यांच्या घराजवळील मूक-बधिर शाळेच्या मागे असलेल्या जवळच्या रस्त्याने जात होती. मात्र मुसळधार पावसामुळे झालेल्या दलदलीत ते फसले. ही घटना बघितल्यावर विशाल साळवे या व्यक्तीने ही माहिती निगडी अग्निशमन विभागाला दिली.
घटनेची माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन दलाचे जवान घटनास्थाळी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी करून दोर, शिडी आणि हुकच्या साह्याने निळकंठ पाटील यांना सुखरूप बाहेर काढले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.