मावळचे ईव्हीएम बालेवाडीत कुलूपबंद
विकास शिंदे -
मावळ लोकसभा मतदारसंघात सोमवारी रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होते. त्यामुळे ईव्हीएम स्वीकृती केंद्रात येण्यास रात्री वेळ झाला. मंगळवारी सकाळी नऊ वाजता स्वीकृती केंद्रावरून बालेवाडीतील आणण्यात आल्या आहेत. बालवाडीच्या वेटलिफ्टिंग हाॅलमधील स्ट्राँगरूममध्ये सील करण्यात आल्या. त्यावर चोवीस तास कडेकोट बंदोबस्त राहणार असून सीसीटीव्हीद्वारे ईव्हीएम स्ट्राँग रूमवर नजर राहणार आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली.
मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (१३ मे) एकूण ५४.८७ टक्के मतदान झाले. मावळातील कर्जत, उरण, खोपोली भागात सोमवारी उशिरापर्यंत मतदान झाले. त्यामुळे ईव्हीएम स्वीकृती केंद्र येण्यास उशीर झाला. त्यानंतर मंगळवारी सकाळी ९ वाजता स्वीकृती केंद्रावरून बालेवाडी येथे नेण्यात आल्या. ईव्हीएम मशिन व निवडणूक कागदपत्रे म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील वेटलिफ्टिंग हॉलच्या स्ट्राँग रूममध्ये सील करण्यात आल्या. या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात ठेवला आहे. मतदान यंत्रे स्ट्राँग रूममध्ये ठेवून ते कुलूप लावून सीलबंद करण्यात आले आहे. त्या ठिकाणी २४ तास पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. तसेच रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण आणि कर्जत विधानसभा मतदारसंघातूनही ईव्हीएम दाखल झाले आहेत.
उन्हाळी पावसापासूनच्या सुरक्षिततेच्या अतिरिक्त उपाययोजनेबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत विभाग, अग्निशमन विभाग यांना सूचना देण्यात आल्या. त्याचबरोबर सीआरपीएफ, एसआरपीएफ व पोलीस यांचा पुरेसा बंदोबस्त स्ट्राँग रूम ठेवला आहे. असेही निवडणूक निर्णय अधिकारी सिंगला यांनी सांगितले.
मतदान ईव्हीएम स्ट्राँग कडेकोट बंदोबस्त
मावळ लोकसभेतील मतदान पूर्ण झाल्यानंतर बालेवाडीतील स्ट्राँग रूमला सीआरपीएफ, सीआरपीएफ व पोलीस यांनी पुरेसा बंदोबस्त ठेवला आहे. यामध्ये केंद्रीय राखीव दल, राज्य राखीव दल यांची प्रत्येकी एक कंपनी त्याचबरोबर स्थानिक पिंपरी-चिंचवड पोलिसांचे उपायुक्त बापू बांगर, साहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे, अन्य एक साहाय्यक पोलीस आयुक्त, दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चार साहाय्यक निरीक्षक/फौजदार, वीस कर्मचारी हे सकाळी आठ ते रात्री आठ या वेळात तैनात करण्यात आले आहेत. त्याचबरोबर रात्री आठ ते सकाळी आठ या कालावधीसाठी एक साहाय्यक पोलीस आयुक्त, दोन वरिष्ठ निरीक्षक, चार साहाय्यक निरीक्षक/फौजदार वीस कर्मचारी असा सशस्त्र बंदोबस्त या ठिकाणी तैनात असणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.