किशोर आवारेंची दिवसाढवळ्या हत्या
जनसेवा विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर तळेगाव नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर दिवसाढवळ्या प्राणघातक हल्ला झाला. हल्ल्यानंतर रक्ताच्या थारोळ्या पडलेल्या आवारे यांना सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आवारे आज तळेगांव दाभाडे नगरपरिषदेत मुख्याधिकाऱ्याला भेटण्यासाठी आले होते. मुख्याधिकाऱ्याला भेटून आवारे दुपारी दोनच्या सुमारास बाहेर पडले होते. त्यावेळी दबाधरून बसलेल्या चौघांनी त्यांच्यावर हल्ला केला. चार जणांपैकी दोघा जणांनी त्यांच्यावर गोळीबार केला. तर दोन जणांनी कोयत्याने वार केले आहेत.
आवारे यांच्यावर प्राणघातक हल्लाकेल्यानंतर हल्लेखोर काही काळ तिथेच उभे होते. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आवारे यांना सोमाटणे येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतू, गंभीर जखमी झालेल्या आवारे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.