इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या विळख्यात, वारकऱ्यांचं आरोग्य धोक्यात!
संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा अवघ्या काय दिवसांवरती येऊन ठेपला असतानाच, इंद्रायणी नदी पुन्हा एकदा प्रदूषणाचा (Indrayani River Pollution) विळख्यात अडकलीय. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने वारकरी बांधव अलंकापूरीमध्ये दाखल होणार आहेत. याच इंद्रायणी नदीमध्ये हे वारकरी बांधव स्नान करतात तसेच पाणी तीर्थ म्हणून घेत असतात. त्यामुळं या प्रदुषित पाण्यामुळे त्यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नदीकाठी असलेल्या औद्योगिक कारखान्यांमधून रसान मिश्रित पाणी या नदीमध्ये सोडले जाते त्यामुळे वारंवार ही नदी प्रदूषित होत असते. त्यातच आळंदीचा पालखी प्रस्थान सोहळा काही दिवसांवर आल्यानं आता याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ, आळंदी नगरपरिषद आणि स्थानिक प्रशासन गांभीर्याने घेते का हे पहावे लागणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.