HSC Result 2024: पिंपरी-चिंचवडमध्ये बारावीचा निकाल लागला ९६.६४ टक्के

बारावीचा निकाल मंगळवारी (दि. २१) दुपारी एक वाजता लागला अन् विद्यार्थ्यांची धाकधूक संपली. शहरात बारावीचा निकाल ९६.६४ टक्के लागला. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात २.२ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

HSC Result 2024

संग्रहित छायाचित्र

विकास शिंदे

बारावीचा निकाल मंगळवारी (दि. २१) दुपारी एक वाजता लागला अन् विद्यार्थ्यांची धाकधूक संपली. शहरात बारावीचा निकाल ९६.६४ टक्के लागला. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात २.२ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यात ९७.७४ टक्के मुलींनी बाजी मारली आहे. तुलनेत मुलांनी ९५.६४ टक्के मिळवले. (HSC Result 2024)

यंदा ४० शाळांनी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली, तर दुसरीकडे चिंचवडमधील सरस्वती इंग्लिश मीडियम कॉलेजने सर्वाधिक कमी ६६.६६ टक्के मिळविले आहेत. निकाल पाहण्यासाठी शहरातील काही शाळांमध्ये स्‍क्रीनवर पाहण्याची सोय केली होती. निकाल पाहताच विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जल्लोष सुरू केला अन्‌ सगळीकडे एकच जोश निर्माण झाला. रिपिटर ७५.०९ टक्के निकाल लागला आहे. (HSC Result 2024 Pimpri Chinchwad)

पिंपरी-चिंचवड शहरातून १८ हजार १८३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यात ९ हजार ५७६ मुले आणि ८ हजार ६०७ मुलींचा समावेश होता. ९ हजार ५३७ मुले, ८ हजार ५७० मुली असे एकूण १८ हजार १०७ विद्यार्थांनी परीक्षा दिली. त्यापैकी ९ हजार १२२ मुले आणि ८ हजार ३७७ मुली असे मिळून १७ हजार ४९९ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात ९७.७४ टक्के मुलींनी बाजी मारली आहे.  हसरे चेहरे आणि आनंदी चेहऱ्यांनी महाविद्यालयाचे कॅम्पस फुलून गेले होते. एकूणच यंदाच्या निकालामुळे सगळ्याच महाविद्यालयात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले.

रात्र प्रशालेचा ७० टक्के

चिंचवडमधील चिंतामणी रात्र प्रशालेने ७० टक्के मिळविले आहेत. गेल्या वर्षी ६२.५० टक्के निकाल लागला होता. या वर्षी ११ विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थ्याने ‘फर्स्ट क्लास’ मिळविला असून ६ जणांनी ५० टक्क्यापेक्षा अधिक गुण मिळविले आहेत. रात्र प्रशालेच्या निकालात ८ टक्क्यांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest