पिंपळे सौदागरमध्ये भुस्खलनामुळे रस्ता खचला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रोड वरील छत्रपती चौकातील नवीन बांधकाम चालु असलेल्या ठिकाणी भूस्खलनामुळे रस्ता खचला आहे. आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक नाना काटे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी महापालिकेचे अधिकारी होते. संबंधित अधिकाऱ्यांना उपाययोजना करण्याच्या सूचना देखील करण्यात आल्या आहेत. दरम्यान, याठिकाणी रस्त्यात असलेली पाणी पुरवठा लाईन, व स्ट्रॉम वॅाटर लाईन देखील तुटलेली आहे.
पोलीस आणि महापालिका विभागाकडून तात्काळ उपाययोजना करत बॅरीकेटींग केले आहे. तसेच हा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे पाईप लाईन व रस्ता दुरूस्ती करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.