खेळता खेळता तीन वर्षीय चिमुरड्याला दिले विहिरीत ढकलून; दुसऱ्या दिवशी विहीर रिकामी केल्यावर आढळला मृतदेह
घराजवळ खेळताना वसीम नाज्जी मुद्दिन खान (Wasim Naji Muddin Khan) या ३ वर्षीय चिमुरड्याला चार वर्षांच्या दोघा मुलांनी विहिरीत ढकलून दिल्याची धक्कादायक घटना घडली. चिमुरडा सापडत नसल्याने अपहरणाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी शोधाशोध सुरू केली होती. तेव्हा यातीलच एका चार वर्षीय मुलाने आम्ही खेळता खेळता त्याला विहिरीत ढकलून दिल्याचे सांगितले आणि पोलिसांसह अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आणि अग्निशमन दलाने संपूर्ण विहीर रिकामी केली तेव्हा त्यामध्ये वसीम या चिमुरड्याचा मृतदेह आढळून आला आहे.
सोमवारी सायंकाळी घराजवळ असलेल्या विहिरीजवळ ही मुले खेळत होती आणि त्याचदरम्यान खेळता खेळता मुलांनी वसीम याला विहिरीत ढकलून दिले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पंपिंग मोटारीच्या साह्यायाने या विहिरीतील पाणी बाहेर काढल्यावर वसीम याचा मृतदेह आढळून आला.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.