पीएमपीएमएलकडून गहुंजे स्टेडिअमसाठी विशेष सुविधा
गहुंजे येथे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक २०२३ स्पर्धेचे ५ सामने होणार आहेत. या स्पर्धेला जाण्याऱ्या क्रिकेटप्रेमींची गैरसोय होऊ नये, यासाठी पीएमपीएमएल तर्फे विशेष बस सुविधा पुरविण्यात येणार आहे. सामन्यांचे वेळापत्रक देखील जाहीर झाले आहे. त्यास अनुसरून पीएमपीएमएलकडून गहूंजे स्टेडियमसाठी पुणे मनपा भवन, कात्रज व निगडी टिळक चौक बस स्थानक या तीन ठिकाणांहून बसेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच क्रिकेट शौकिनांची गर्दी वाढल्यास आवश्यकतेनुसार तीनही बसस्थानकांवरून जादा बसेसचे नियोजन करण्यात येईल, असे ही पीएमीएमएलतर्फे सांगण्यात आले आहे.
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील पाच सामने पुण्यातील गहुंजे मैदानावर होणार आहेत. यातील पहिली लढत येत्या १९ ऑक्टोबर रोजी आहे. यासाठी पुणे महापालिका भवन, कात्रज बाह्यवळण बसस्थानक, निगडी टिळक चौक येथून १९ आणि ३० ऑक्टोबर तसेच १ नोव्हेंबर आणि ८ नोव्हेंबर रोजी गाड्या सोडण्यात येणार आहेत. सकाळी ११, ११.३५, दुपारी १२.०५ आणि १२.३० वाजता गाड्या सुटणार असून, त्यासाठी प्रती व्यक्ती शंभर रुपये तिकीट दर निश्चित करण्यात आला आहे.
११ नोव्हेंबर रोजी याच स्थानकावरून सकाळी ८.२५, ८.५० आणि सकाळी ९ वाजता गाड्या सुटणार असल्याची माहिती पीएमपीच्या वाहतूक विभागाकडून देण्यात आली. पीएमपीच्या या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.