नोकरीची सुवर्ण संधी, अग्निशमन विभागात १९१ पदे भरणार

शहराचा दिवसेंदिवस विस्तार होत असताना लोकवस्त्या आणि औद्योगिक भागात सातत्याने लहान-मोठ्या आगीच्या घटना घडत आहेत. त्या तुलनेत अग्निशमन केंद्रांची (Fire station) संख्या आणि मनुष्यबळ अपुरे असल्याने आगीच्या घटनांवर नियंत्रण आणताना मोठ्या अडचणी येतात.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Amol Warankar
  • Sun, 24 Mar 2024
  • 03:23 pm
PCMC Jobs

नोकरीची सुवर्ण संधी, अग्निशमन विभागात १९१ पदे भरणार

लोकसंख्येच्या तुलनेत १८ अग्निशमन केंद्रांची गरज असताना सध्या केवळ ८ केंद्रे, पिंपरीत मध्यवर्ती केंद्रासह अन्य दहा कार्यालयांची उभारणी सुरू

शहराचा दिवसेंदिवस विस्तार होत असताना लोकवस्त्या आणि औद्योगिक भागात सातत्याने लहान-मोठ्या आगीच्या घटना घडत आहेत. त्या तुलनेत अग्निशमन केंद्रांची (Fire station)  संख्या आणि मनुष्यबळ अपुरे असल्याने आगीच्या घटनांवर नियंत्रण आणताना मोठ्या अडचणी येतात. यासाठी अग्निशमन विभागात १५० फायरमनची सरळसेवेने भरती करण्यात येणार आहे. शहराच्या  लोकसंख्येनुसार शहरामध्ये १८ अग्निशमन केंद्रे असणे गरजेचे आहे. मात्र, सद्यस्थितीत शहरात केवळ आठ केंद्रे आहेत. (PCMC)

(PCMC Jobs) पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे ३० लाखांच्या घरात आहे. शहरात झोपडपट्ट्यांबरोबरच दाट लोकवस्तीचा भाग मोठ्या प्रमाणात आहे. टोलेजंग इमारती उभ्या राहात आहेत. मोठ्या संख्येने औद्योगिक तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या सुरू झाल्या आहेत. लोकसंख्येनुसार शहरामध्ये १८ अग्निशमन केंद्रे असणे गरजेचे आहे.

मात्र, सद्यस्थितीत शहरात केवळ आठ केंद्रे आहेत. लोकसंख्या वाढत असताना अग्निशमन विभागात अपुरे मनुष्यबळ असल्याने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. अग्निशमन विभागात प्रशासकीय कामकाजामधील अधिकारी, कर्मचारी वगळता सहा लिडिंग फायरमन तर ३० फायरमन कार्यरत आहेत. भविष्यात पिंपरीत मध्यवर्ती केंद्रासह दहा केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे मनुष्यबळाची आणखी गरज आहे.

अग्निशमन विभागात कर्मचारी संख्या वाढविण्याच्या दृष्टीने महापालिकेने तयार केलेल्या आकृतीबंधानुसार १९१ पदांची भरती करण्यात येणार आहे. त्यानुसार यामध्ये १५० फायरमन, दहा सहअधिकारी, सहा स्थानक अधिकारी, १५ यंत्रचालक, दहा लिडिंग फायरमन अशा १९१ पदांची सरळ सेवेने भरती करण्याचे अग्निशमन विभागाचे भविष्यात नियोजन आहे. पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या स्थायी आस्थापनेवरील ‘ड’ संवर्गातील अग्निशमन विमोचन, फायरमन ही १५० रिक्त पदे सरळसेवेने भरती करण्यात येणार आहेत.

यासाठी जाहिरात नुकतीच प्रसिद्ध केली आहे. या भरतीची सविस्तर माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर पाहण्यास उपलब्ध आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest