थेरगावात पुन्हा अवतरली 'हिमनदी' ! स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त
पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad ) भागातून संथगतीने वाहणारी पवना नदी (Pavana river) पुन्हा प्रदूषित झाली. नदी पत्रात रसायन मिश्रित सांडपाणी मिसळल्यामुळे संपूर्ण (Pune News) नदीपात्रच फेसाळले आहे. त्यामुळे, जणूकाही थेरगावमध्ये हिमनदी अवतरल्याचे दुर्भाग्यपूर्ण चित्र पहायला मिळत होते.
दरम्यान, गुरुवारी (दि.२) सकाळी केजुदेवी धरण परिसरात पवनानदी पात्र पूर्ण प्रदूषित झाल्याने नागरिक प्रचंड संताप व्यक्त करत होते. थेरगाव परिसरात पवनेचे नदीपात्र वारंवार प्रदूषित होऊनही, महापालिका यावर ठोस कार्यवाही करताना दिसत नसल्याने स्थानिक नागरिक आणी पर्यावरण संस्था प्रचंड रोष व्यक्त करत आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.