पिंपरी चिंचवडमधील गॅस चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
पिंपरी चिंचवड परिसरात अवैधरित्या घरगुती सिलेंडरमधून गॅस चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफास केला आहे. पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट २ ने थेरगावमध्ये दोन वेगवेगळ्या केलेल्या कारवाईत सुमारे १ लाख ५० हजार २२५ रुपयांचे ७२ गॅस सिलेंडर जप्त केले आहेत. या प्रकरणी तीन जणांना पोलीसांनी अटक केली आहे.
विष्णु ज्योतीराम सुतार (वय २४ वर्षे रा. सदाशिव कॉलनी, साने चाळ, पदमजी पेपर मिल जवळ थेरगाव, पुणे), अतुल श्रीहरी पांचाळ (वय २५ वर्षे रा. सदाशिव कॉलनी, साने चाळ, पदमजी पेपर मिल जवळ थेरगाव, पुणे) आणि जयराम सर्जेराव चौधरी (वय २२ वर्षे रा. देवा मेटकरी यांची रुम लमाण तांडा नेर्हे दत्तवाडी ता. मुळशी जि. पुणे) अशी अटक करण्य़ात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात राज्यभरासह परराज्यातुन लाखोचे संख्येने कामगार वर्ग व विद्यार्थी प्रमाणत येत असतात. मात्र, नवीन शहर असल्या कारणाने त्यांना घरगुती गॅस सहज उपलब्ध होत नाही. अशावेळी अधिकचे पैसे देऊन गॅस सिलेंडर खरेदी करावा लागतो. याचाच फायदा घेऊन इतर मार्गाने गॅस सिलेंडर पुरणारी टोळी अवैधरित्या पाईप सर्किटच्या सहाय्याने मोठ्या सिलेंडरमधून ४ किलोच्या छोटया गॅस टाक्यांमध्ये बेकायदेशिरपणे गॅस रिफील करतात.
थेरगावमध्ये अशाच प्रकारचा काळा बाजार चालू असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून पोलीसांनी थेरगाव येथील आर्या गॅस सर्विस या दुकानावर छापा टाकला. यावेळी विष्णु सुतार आणि अतुल पांचाळ या दोघांना गॅस चोरताना रंगेहात पकडले. यावेळी त्यांच्याकडून ७८ हजार ७०० रु किंमतीचे एकुण २१ घरगुती वापराचे गॅस भरलेले विविध कंपनीचे सिलेंडर, ०१ घरगुती वापराचे रिकामे सिलेंडर, ०१ घरगुती वापराचे अर्धा गॅस काढलेली टाकी, ०१ व्यावसायीक वापराचे रिकामे सिलेंडर, ०५ लहान सिलेंडर, ०१ लहान पितळी रिफिलर, ०१ लोखंडी रिफील पाईप यासह इतर साहित्य जप्त करण्यात आले.
तसेच दुसऱ्या कारवाईत जयराम चौधरी याला अटक केली असून त्याच्याकडून ७१ हजार ५२५ रुपये किमतीचा एकुण ९ घरगुती वापराचे गॅस भरलेले असलेले सिलेंडर, ११ घरगुती वापराचे रिकामे विविध कंपनीचे सिलेडर, विविध कंपनीचे ०२ व्यावसायीक वापराचे रिकामे सिलेंडर, ११ भरलेले लहान सिलेंडर, १० रिकामे लहान सिलेंडर यासह इतर ऐवज जप्त केला आहे. दोन्ही कारवायामध्ये पोलीसांनी एकूण १ लाख ५० हजार २२५ रुपये कींमतीचा मुदेमाल मुद्देमाल जप्त केला आहे. यात सुमारे ७२ विविध कंपनीचे गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.