पिंपरी-चिंचवड : रहाटणीत चार सिलेंडरचा स्फोट; चार झोपड्या जळून खाक
मजुरांच्या झोपड्यांना लागलेल्या आगीत चार गॅस सिलेंडरचा स्फोट (Gas cylinder explosion) झाला. ही घटना शनिवारी (६ एप्रिल) सायंकाळी गोडांबे चौक, रहाटणी येथे घडली. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झालेले नाही. (Pimpri Chinchwad)
अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी ५.३९ वाजताच्या सुमारास रहाटणीतील गोडांबे चौकाजवळ असलेल्या सुखवानी आर्या साइट जवळील मजुरांच्या झोपड्यांना आग लागल्याची वर्दी मिळाली. त्यानुसार थेरगाव आणि अग्निशामक मुख्यालय येथून प्रत्येकी एक बंब घटनास्थळी दाखल झाला. त्यावेळी आगीत चार झोपड्यांमधील पाच किलो वजनाच्या चार सिलेंडरचे एकामागोमाग एक स्फोट झाले. स्फोटाच्या आवाजामुळे परिसरास घबराट निर्माण झाली होती.
अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवत झोपड्यांमधून सात गॅस सिलेंडर बाहेर काढल्याने पुढील अनर्थ टळला. तसेच आगीच्या घटनेच्यावेळी सर्व मजूर कामावर गेले असल्याने कोणीही जखमी झालेले नाही. मात्र आगीमुळे चार जणांचे घरातील साहित्य जळून खाक झाले. मात्र आगीचे कारण समजू शकले नाही.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.